Type to search

जळगाव राजकीय

अभिषेक पाटील यांच्या प्रचाराचा शरद पवार यांचे हस्ते श्री गणेशा

Share

जळगाव । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले राष्ट्रवादी चे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्राचाराचा श्री गणेशा बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते नारळ वाढवून करण्यात आला . या वेळी जिल्ह्याचे प्रभारी राज्याचे माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, निरीक्षक करण खलाटे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, नामदेव चौधरी, कल्पना पाटील यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी शरद पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच जळगाव शहरातील एकूण परिस्थिती , शहरातील खड्डे या बाबत चांगलाच समाचार घेतला . सोबतच नागरिकांची मानसिकता बदलत चालली असून सरकारने दिलेली आश्वासने हे सरकार पूर्ण करू शकले नसल्याने अपयशी आहे असा टोलाही लगावला . दरम्यान या वेळी मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते. या नंतर गोलाणी मार्केट मधील हनुमान मंदिरापासून प्रचार फेरी देखील काढण्यात आली या प्रचार फेरीला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . समारोप बी. जे मार्केट जवळ करण्यात आला .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!