Type to search

विमानतळावर दोन बिबटे जेरबंद

जळगाव

विमानतळावर दोन बिबटे जेरबंद

Share

जळगाव । विमानतळ परिसरात असलेल्या दोन बिबट्यांना सापळा लावून आज पहाटे जेरबंद करण्यात आले आले, अशी माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.

बिबट्यांना पिंजर्‍यामध्ये पकडण्यासाठी वनविभागाकडून विमानतळ परिसरात संभावित जागेवर ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. त्यात दोन बिबट जेरबंद झाले. वैद्यकीय अधिकारी संजय खाचणे यांनी बिबट्यांची तपासणी केली. ते सुदृढ असल्याचे डॉ.खाचणे यांनी सांगितले. या मोहिमेत पी.जे.सोनवणे, वनपाल, सी.व्ही.पाटील, दीपक पाटील, उल्हास पाटील, जितेंद्र चिंचोले, अश्विनी ठाकरे, वैशाली साळी व डी.डी.पवार यांनी सहभाग घेतला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!