Type to search

जळगाव

वाघूर धरणात 15 टक्के पाणीसाठा

Share

जळगाव । जळगाव शहरासह औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूर धरणातील जिवंत पाणीसाठा हा 32 द. ल. घ. मि. म्हणजे 15.5 टक्के पाणीसाठा आहे. तीन दिवसाआड नियोजनाप्रमाणे योग्य ते पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी अभियंता डी. एस. खडके यांना दिल्या.

तीन दिवसाआड नियोजन
या पाणी पुरवठ्याच्या कामासाठी 2 पंप कार्यान्वित करण्यात आले असून 100 कोटीतून पुन्हा 2 पंप मागवण्यात आले आहेत, अशीही माहिती उपमहापौर यांनी दिली. शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू ठेवला तरी किमान 5 महिने पाणी पुरवठा जळगाव शहरास पुरेल मात्र त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!