Type to search

डंपरने सायकलस्वाराला चिरडले

जळगाव

डंपरने सायकलस्वाराला चिरडले

Share

जळगाव । नेरी नाका स्मशानभुमीच्या पुढे असलेल्या एस.टी. वर्कशॉपच्या जवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भरधाव जाणार्‍या डंपरने (एमएच 19 झेड-8024 ) सायकलला धडक दिली. यावर स्वार असणारा मुरलीधर वेडू शिंदे (वय-73 रा. अयोध्या नगर) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपरवर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

डंपरचालक नरेंद्र रमेश मराठे (वय 22, रा. पार्वतीनगर, जळगाव) याला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले मुरलीधर वेडू शिंदे हे सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी होते. आज सकाळी ते स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी जात असतांनाच हा अपघात झाला.त्यांच्यासोबत असणार्या बँकेच्या पासबुकवरूनच शिंदे यांची ओळख पटली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार होता.शहरातल्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्या रस्त्यांवरून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!