Type to search

जळगाव

पीकविम्याचा 64 हजारांचे वर शेतकर्‍यांना लाभ

Share

जळगाव । जिल्हा बँकेमार्फत विविध विकास कार्यकारी सोसायट्या ग्रामीण स्तरावर कार्यरत असून त्यातील कर्जदार व बिगर कर्जदार सभासद असलेल्या 64 हजार 658 शेतकर्‍यांना सन 2016 ते 2018 पर्यत सूमारे 10716.63 लाख रकमेचा पिकविम्याचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा निबंधक सुत्रांनी दिली आहे.

जिल्हयातील विविध विकास कार्यकारी सोसायट्यांमार्फत ग्रामीण पातळीवर जिल्हा बँकेमार्फत पीक तसेच मध्यम मुदतीचे कर्ज पुरवठा करण्यात येतो. यात शेतकर्‍यांना अवकाळी पाउस,गारपीट वा अन्य नैसर्गीक कारणांमुळे पिकांचे नुकसानीसह आर्थीक नुकसानीस सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा बँकेअंतर्गत खरीप रब्बी पिकांसह फळपिक विमा देखिल विमा कंपन्याकडून काढण्यात आला होता. विमा कंपनीकडे 272443 सभासदांसाठी मंजुर केलेला रकमेपोटी 6498.46लाख रकमेचा प्रिमीयम भरण्यात आला होता. त्यापैकी 64658 सभासदांचा 10716.33 लाख रकमेचा क्लेम विमा कंपनीने मंजूर केला होता. त्यानुसार बँकेस रकम सभासदांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सुत्रांनी जिल्हा निबंधकाकडे दिली असल्याचे विभागाकडून सांगीतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!