Type to search

जळगाव

उमाळा रस्त्यावरील 65 केव्हीची डीपी जळाली

Share

जळगाव । शहरापासून जवळच असलेल्या उमाळा रस्त्यावरील बाहेरच्या चौकात बसविण्यात आलेली 65 केव्हीची डिपी जळाल्याची घटना शनिवार दि. 1 जून रोजी घडली. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाली आहे.

उमाळा गावाची लोकसंख्या 3 हजार 200 एवढी असून औरंगाबाद महामार्गाच्या रस्त्यावरच वसलेली आहे. उमाळा गावात ग्रामपंचायतीचे 11 सदस्यांचे असून सरपंच काही दिवसांपासून दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वी उमाळे गावात भीषण पाणी टंचाईमुळे चर्चेत आले होते. आता गेल्या पाच दिवसांपूर्वी उमाळा रस्त्यावरील चौकातील 65 केव्ही डिपी जळाल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी वॉटरसप्लायची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे उमाळावासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुन्हा पाणी टंचाईच्या झळा नागरिकांच्या वाटेला आले असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. गावाचा कारभारीच महिला सरपंच असल्याने उर्वरीत सदस्य सुध्दा त्यांच्यात मेळ नसल्यामुळे पाणी टंचाईसारख्या विषयाला बगल दिली जात आहे. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी जळालेल्या विद्युत रोहित्रासंदर्भात एमएसईबीकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र या विषयाकडे एमएसईबीचे अधिकार्‍यांनी गांर्भियाने घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

उमाळा गावातील पाणी पुरवठा करणारी डीपी जळाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून महावितरणकडे तक्रार केली आहे. चार दिवस उलटूनही नवीन डीपी बसविण्यात आलेली नाही.
– मनोहर पाटील,
माजी सरपंच, उमाळा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!