Type to search

जळगाव

चार डॉक्टरसह एक अभियंता करणार उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

Share

जळगाव । सतराव्या लोकसभेसाठी उत्तर महाराष्ट्रातुन आठही जागा निवडून आणण्याचा संकल्प राज्याचे संकटमोचक ना.गिरीष महाजन यांनी घेतला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या विभागातुन वैद्यकीय सेवा देणार्‍या चार डॉक्टरांसह बी.टेकची पदवी घेतलेले अभियंता लोकसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत. यात निवडून आलेल्या तीन डॉक्टर उमेदवारांपैकी दोन जण तज्ज्ञ डॉक्टर आहेत.

पुर्वीे राजकारण येण्यासाठी वैद्यकिय तसेच अन्य व्यवसाय पेशा सोडून काणी इच्छुक नसायचे. केवळ राजकिय वारसा लाभलेल्या व्यक्तिच राजकारणा दिसून येत होत्या. परंतुु कालमान प्रभावाने समाजकारणाचा वारसा घेवून अनेक उच्च विद्याविभुषित डॉक्टर, अभियंते, सेवानिवृत्त प्रशासनिक अधिकारी,प्राध्यापक यांचेसह वकीली व्यवसायात नामांकीत असलेल्या व्यक्ति देखील ग्रामीण पातळीपासून ते थेट संसदेत आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातुन सामाजिक कार्याचा ठसा उमटवित आहेत. धुळे लोकसभेतुन विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारमधून डॉ. हीना गावित, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार तर नगर येथून डॉ. सुजय विखे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले.

त्यामुळे या विभागातुन चार डॉक्टर राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतील. या चार जणांपैकी डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित यांनी गेल्या 2014 च्या निवडणुकीतही विजय मिळवला होता. धुळयाचे डॉ. सुभाष भामरे कॅन्सरतज्ज्ञ, डॉ. सुजय विखे मेंदूविकार तज्ज्ञ तर डॉ.भारती पवार आणि डॉ. हीना गावित या एमबीबीएस आहेत. लोकसभेत या विभागातुन 4 डॉक्टर्ससह अभियांत्रीकी क्षेत्रातील बी.टेक. पदवी घेतलेले उन्मेष पाटील हे जळगांवचे प्रतिनिधित्व करणार असल्याने राज्याचे आणि देशाचे आरोग्यविषयक तसेच अभियांत्रीकी क्षेत्राविषयीचे धोरण अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यामधुन चर्चीली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!