Type to search

जळगाव

महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येनंतर मृतदेह आणला जिल्हाधिकारी कार्यालयात

Share

जळगाव । जळगाव येथील वाघनगरातील रहिवाशी असलेल्या डॉ. पायल तडवी ह्या नायर हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत होता. अनुसूचति जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर त्यांना प्रवेश मिळाला होता. सिनियर डॉक्टर पायल तडवी यांना हेतुपुरस्कर मानसिक त्रास देवून रॅगिंग करीत असल्याने दि.23 रोजी डॉ.पायल तड

वी यांनी आत्महत्या केली होती. शवविच्छेदन करुन मृतदेह शुक्रवारी सकाळी जळगावात आल्यानंतर संतप्त कुटुंबिय, नातेवाईक व समाजबांधानी शवयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या महिला डॉक्टरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी कुटुंबिय, नातेवाईक व समाजातील विविध संघटनांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना निवेदन देण्यात आले. डॉ.पायल तडवी यांची शवयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्याने परिसरात गोंधळ होवून तणाव निर्माण झाला होता.

जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सलिम तडवी यांची मुलगी डॉ.पायल तडवी वय 23 ह्या नायर हॉस्पिटल भायखळा, मुंबई येथे स्त्रीरोग विभागात मे 2018 पासून पी.जी करीत होत्या. सध्या त्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होत्या. पहिल्या वर्षापासून सिनियर असलेल्या डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर व डॉ.अंकिता खंडेलवाल या डॉक्टरांकडून डॉ.पायल तडवी यांना हेतुपुरस्कर त्रास देण्यात येत होता. डॉ.पायल तडवी यांची अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर निवड झाली असल्याने त्यांना क्षुल्लक कारणावरून मानसिक त्रास देण्यात येत होता. या महिला डॉक्टरांकडून डॉ.पायल तडवी यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. तुझी आर्थिक परिस्थिती नसतांना केवळ तुझी अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर निवड झाली आहे. तुला आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये पाय ठेवू देणार नाही. आम्ही असे पर्यंत तुला डिलेव्हरी वार्डमध्ये येवू देणार नाही. तुला शिकु देणार नाही, तुला हाकलून देवू असे बोलून वारंवार धमकी देण्यात येत होती. तसेच व्हॉटस्गृपवरही डॉ.पायल तडवी यांच्या बाबतीत कॅमेंटस करून पायल भगोडी है, उसे भगाना चाहिए असे मॅसेज करून त्यांच्या बाबतीत बदनामीकारक मजकूर प्रसारीत करुन मानसिक त्रास देवून डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघांनी डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. हा प्रकार डॉ.तडवी यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या आई आबेदाबी तडवी, पती डॉ. सलमान तडवी यांना सांगितला होता

जातीयव्यवस्थेच्या बळी ठरल्या डॉ.पायल तडवी
मुंबई भायखळा येथील नायर वैद्यकीय रुग्णालयात अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर डॉ. पायल तडवी यांना मागील वर्षी संधी मिळाली होती. त्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होत्या. पहिल्या वर्षापासून त्यांच्या सिनीअर डॉक्टरांकडून त्यांची रँगिंग सुरु होती. त्यातच डॉ. तडवी ह्या आदिवासी तडवी भिल्ल असल्याने डॉ. हेमा आहुजा, डॉ भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल या डॉक्टरांकडून त्यांचा मानसिक छळ सुरु होता. त्यामुळे डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केल्याने त्या जातीयव्यवस्थेच्या बळी ठरल्या असल्याचे बोलले जात आहे.

आग्रीपाडा पोलिसात तिन्ही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ.हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांविरुध्द मुंबई येथील आग्रीपाडा पोलीसात मयत पायल तडवी यांच्या आई आबेदाबी तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. शुक्रवारी सकाळी संतप्त समाजबांधवांनी शवयात्रा काढून मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला.

तिन्ही महिला डॉक्टरांना तत्काळ अटक करुन कारवाई करा!
डॉ.तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यार्‍या तिन्ही महिला डॉक्टरांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी कुटुंबिय व समाजबांधवांनी शवयात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणली. यावेळी राजु तडवी, मुबारक अलीखा,मिरखा तडवी, इब्राहिम तडवी,युवा कृतीचे हुसेन तडवी, सकावत तडवी, तडवी अमीत तडवी,अ‍ॅड.राहुल तडवी,नासीर अकबर, बबलु तडवी, हाजी तडवी, शरीफा तडवी,प्रा.सारीका अली, संजय रमजान, अमीर खॉ, मुराद तडवी यांचेसह आदिवासी संघर्ष मोर्चा, आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती,आदिवासी सेवा समिती, आदिवासी एकता मंच, तडवी पंचायत आदी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रावेर तालुक्यातील समाजबांधवांनी रस्त्यावरच मृतदेहाची शवपेटी ठेवल्याने काहीवेळी दोनही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी डिवायएसपी डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, रामानंद नगर पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह कर्मचार्‍यांनी नातेवाईक व समाजबांधवाची समजूत घातल्यानंतर कुटुंबिय व समाजातील पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईबाबतचे निवेदन दिले.

रँगिगची कुटुंबियांनी केली अधिष्ठातांकडे तक्रार
डॉ.पायल तडवी यांनी सिनियर डॉक्टर हेतु पुरस्कर त्रास देत असल्याने याबाबत पती डॉ. सलमान तडवी, आई आबेदा तडवी यांच्या सांगितले होते. त्यानंतर त्यांनी या रॅगिंगबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता, वस्तीगृह प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने दि.22 रोजी रात्री डॉ.हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांच्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी वस्तीगृहातील खोलीत आत्महत्या केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!