Type to search

maharashtra जळगाव

कार-मोटारसायकलच्या धडकेनंतर संतप्त जखमी तरुणांनी फोडल्या कारच्या काचा

Share
जळगाव । शहरातील एम.जे कॉलेजजवळील चौकात कार-मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात कार-मोटारसायकलचे नुकसान होवून मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले. तर एका तरुणाला किरकोळ दुखापत झाली. जखमींना रुग्णालयात नेण्याच्या कारणावरुन कारचालक व जखमी तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या जखमी तरुणांनी कारचालकाला मारहाण करून त्याच्या कारच्या काचा फोडल्याची घटना दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलवरील दोन्ही तरुण जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

कानळदा रोडवरील शिवशंकर रोडवरील रहिवाशी शाम अशो लंके हे त्यांच्या एमएच 19 क्यू 3346 क्रमांकाच्या ओमनी कारने घराकडे जात असतांना एम.जे. कॉलेजच्या चौकात समोरुन येणारे ट्रीपलसीट मोटारसायकलवर भरधाव वेगात कारवर धडकले. या अपघातात मिलींद दिलीप भोई वय 20 व उमेश ललीत सुर्यवंशी वय 21 रा. दोघे हरिविठ्ठल हे जखमी झाले तर मोटारसायकल चालवित असलेल्या तरुणाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर कारमधील शाम लंके यांनी कार थांबवून जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यास तयारी दर्शविली. यावेळी जखमींनी खासगी रुग्णालयात जाण्याचा हट्ट धरल्याने कारचालक व जखमींमध्ये वाद झाला. जखमींनी त्यांच्या इतर सहकारी मित्रांना घटनेची माहिती दिल्यानंतर जखमींसह काही तरुणांनी कारचालकाला किरकोळ मारहाण करून त्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस स्टेशनला आपसात समजोता सुरु होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!