Type to search

maharashtra जळगाव

गिरीश महाजन संकटमोचक सरकारचे!

Share
जळगाव । जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन मुख्यमंत्र्यांनी काय साध्य केले. ठेकेदारांसाठी ही योजना राबवली असून जलयुक्त अभियानाचा फायदा का झाला नाही याचे रहस्य आहे. या उपाय योजना सरकारकडून तातडीने होणे अपेक्षित असले तरी ना.गिरीष महाजन हे तर सरकारचे संकटमोचक असून त्यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे, असा आरोप डॉ.राधेशाम चौधरी यांनी जिल्हा काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परीषदेच्या माध्यमातून केला आहे.

यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची तीव्रता, गांभीर्य समजण्यात तसेच त्यावर मात करण्यासाठी जनतेला दिलासा देणारी मदत करण्याच्या कार्यवाहीत, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यात राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अपयशी ठरले असून जळगाव देखील या दुष्काळाच्या चटक्याने तडफडत आहे. या राज्याला पूर्ण वेळ अनुभवी कृषिमंत्री नाही, नऊ महिन्यांपासून कृषी खात्याला सचिव नाही. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील दुष्काळ,पाणी टंचाईचे भीषण वास्तव मांडले जात आहे.

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र दुष्काळी समितीने बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, अ‍ॅड.संदीप पाटील आदींच्या नेतृत्वात जिल्हाभर दौरे केलेत. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तीन तालुक्यातील नऊ गावांना धावत्या भेटी देऊन सोपस्कार पार पडण्याचे काम केले. दुष्काळाने होरपळलेल्या जनतेच्या दु:खावर फुंकर मारण्याऐवजी पीककर्ज घेऊन एफ डी करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या किती? असा प्रश्न अधिकार्‍यांना विचारला असून काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा निषेध करीत पालकमंत्र्यांनी त्यावर शेतकर्‍यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!