Type to search

maharashtra जळगाव

चोरट्यांपर्यंत पोहचण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी; मागील 20 दिवसांत 8घरफोड्या

Share
जळगाव । शहरात चोरी, घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. जवळपास दररोज शहरात घरफोडीच्या घटना घडत असून पोलीस चोरट्यांपर्यंत पोहचण्यास सपशेल अपयशी ठरत आहे. शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धूमाकुळ घातलेला आहे. शहरात मागील 20 दिवसांत 8 घरफोडीच्या घटना घडल्या असल्याने रात्रीची गस्त कुचकामी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चोरट्यांकडून दिवसा शहरातील बंद घराची रेकी करून रात्री या घरांवर निशाणा साधला जातो. चोरट्यांनी बंद घरे टार्गेट करून लाखो रुपयांचा ऐवज लांबवून नेला आहे. 14 मे रोजी रिंगरोडवरील हरेश्वर नगरातील स्वाती हरिव्यासी हे कुटुंबिय घराच्या गच्चीवर चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यानंतर चोरट्यांनी घरातील 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लांबवून नेला होता. याचवेळी घराचा दरवाजा वाजल्याने गच्चीवर कुटुंबियांनी पाहिल्यानंतर तीन चोरटे मोटारसायकलीने पळतांना दिसून आले होते. तसेच महाबळ परिसरात पारिजात कॉलनी सेवानिवृत्त नायब तहसिलदाराच्या बंद घरात प्रवेश करून चोरटयानी घरात झोपण्यासाठी आलेल्या शेजारील तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवरुन चोरट्यांची दिवसेंदिवस मुजोरी वाढत दिसून येत आहे. शहरात मागील 20 दिवसात 8 घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. लग्नसराई, सुट्यांचे दिवस असल्याने बरेच रहिवाशी बाहेरगावी जात असल्याने चोरट्यांकडून बंदच घरे टार्गेट केला जात आहे.

पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक नावालाच
शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथक (डीबी) असून गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी या अधिकारी व कर्मचार्‍यांवर असते. परंतू पोलीस स्टेशनचे डीबीचे पथक नावालाच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर, शनिपेठ, जिल्हापेठ व रामानंद नगर पोलीस स्टेशनचे डिबी पथकाने कुठलाही मोठा गुन्हा उघडकीस आणलेला नाही. त्याउलट चोरी व घरफोडीच्या घटना घडतच आहे. रात्रीच्या गस्तीसाठीची आरएफआयडी पोलीस यंत्रणेमुळे कर्मचारी फक्त पॉईट तपासत असल्याने रात्री गस्त योग्य पध्दतीने होतांना दिसत नाही.

बसस्थानकावर गस्त वाढविण्याची गरज
नवीन बसस्थानकावर मोबाईल, पर्स, दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बसमध्ये चढतांना गर्दी होत असल्याने चोरटे मोबाईल, महिलांचे पर्स, सोनसाखळी चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे बसस्थानकावर देखील गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवरच
चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबादारी स्थानिक गुन्हे शाखेवरच आहे. मागील आठवड्यात चोरी, घरफोडीतील अट्टल चोरट्यांना पकडण्यात आले होते. या चोरट्यांनी शहरासह जिल्ह्यातील चोरी, घरफोडींची कबुली दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!