Type to search

सुरत रेल्वेगेट अडकल्याने दीड तास वाहतूक ठप्प

maharashtra जळगाव

सुरत रेल्वेगेट अडकल्याने दीड तास वाहतूक ठप्प

Share
जळगाव । शहरातील दूध फेडरेशन जवळील सुरत रेल्वेगेट लोखंडी पाईप एका बाजूने तुटल्याने गेट जवळपास दीड तास अडकले होते. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. गेट बंद झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर गेटचा पाईप जोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाली. गेट अडकल्याने नागरिकांना चांगलाच नाहक त्रास सहन करावा लागला.

शिवाजी नगर पूल तोडण्यात आल्याने सर्व वाहतूक सुरत रेल्वेगेट मार्गे सुरु आहे. त्यामुळे सुरत रेल्वेगेटजवळ मागील अडीच महिन्यांपासून दररोज वाहतूकीची कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्यावतीने दिवसभर याठिकाणी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार दि.18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास स्वयंचलित असलेले रेल्वेगेटच्या एका बाजूचा पाईप तुटल्याने हे गेट अडकले होते. रेल्वे गेटवरील कर्मचार्‍यांनी लागलीच पाईपाचा दुसरा भाग आणून जोडला. त्यामुळे दीड तासाने वाहतूक सुरु झाली. तोपर्यंत सर्वच वाहनधारक चांगलेच ताटकाळले होते.

रेल्वे धक्काकडील रस्त्यावर देखील गर्दी
सुरत रेल्वेगेटजवळील रेल्वे धक्काकडील रस्त्यावर देखील गेट अडकल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.तसेच दोन्ही बाजुला लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वाहतूक सुरुळीत झाली. दररोज सुरत रेल्वेगेटजवळील वाहतूकीचा मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!