Type to search

maharashtra जळगाव

एलईडी दिव्यांबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी

Share
जळगाव । मनपातर्फे शहरात लावण्यात येणारे एलईडी लाईट बाबत शहरवासीयांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून लाईट लावल्यानंतरही त्याचा प्रकाश चांगला पडत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच संथगतीने हे काम सुरू आहे. तरी ठेकेदाराने चांगल्या प्रकाशाचे एलईडी बसवावेत, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

शहरात एलईडी लाईट बसविण्याबाबत एका कंपनीस ठेका देण्यात आला आहे. शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम देखील अनेक दिवसापासून सुरूही झालेले आहे. मुख्य मार्गावर तसेच उपरस्त्यांवर, गल्लीबोळात एलईडी बसविले जात आहेत. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून कमी व्हॅटचे लाईट लावले जात आहेत तसेच तेही दूर दूर असे दिवे लावल्याने त्याचा प्रकाश फारसा पडत नाही. साधारणत: 30 ते 40 व्हॅटचे हे लाईट असावेत असेही नागरिकांककडून समजते. याबाबत ठिकठिकाणाहून तक्रारी येत आहेत. प्रभाग क्र. 10 मध्येही अशाच स्वरुपाच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यापूर्वी एलईडी दिवे बसविण्यात यावेत अशी मागणी शहराच्या अनेक प्रभागातून करण्यात येत आहे.

प्रभाग क्र.8 मध्ये नाराजी
प्रभाग क्र.8 हा खड्डेयुक्त व खदानी असलेला परिसर आहे. या परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असल्याने विजेची व्यवस्था कायम सुरळीत पाहिजे,संबंधित ठेकेदारांकडून संथगतीने काम सुरू आहे. कमी व्हॅटचे लाईट लावले जात आहेत तसेच तेही दूर दूर लावले असल्याने त्याचा प्रकाश फारसा पडत नाही. साधारणत: 30 ते 40 व्हॅटचे हे लाईट असावेत असेही नागरिकांककडून समजते. योग्य नियोजनाचा अभाव दिसून येतो, ठेकेदारावर या कामाचे विनाकारण पैसे द्यावे लागत आहेत, ठेकेदारास दिल्या जाणार्‍या मोबदल्याच्या मानाने कामे व्हायला पाहिजे, याबाबत महापौर, उपमहापौर, प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशीही मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!