Type to search

maharashtra जळगाव

माजी आ.कैलास पाटलांसह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Share
जळगाव । वि.प्र.- चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणीत कोट्यावधीं रूपयांचा अपहार झाल्यासंदर्भात भरत बाविस्कर यांच्या तक्रारीवरून माजी आमदार कैलास पाटलांसह 22 संचालकांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश चोपडा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश जी.डी. लांडबले यांनी दिले आहेत.

चोपडा सुतगिरणीची 29 सप्टेंबर 2017 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविली होती . त्यासाठी 16 सप्टेंबर 2017 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व 26 वा वार्षिक अहवाल प्रसिध्द केला. त्या अहवालात दाखविलेला खर्च व प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये मोठी तफावत आढळून आली. अंदाज पत्रकामध्ये कमी खर्च नमुद करण्यात आला व 29 सप्टेंबर 2017 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासंदासमोर तोच खर्च मांडण्यात आला. सभेत अपहार करण्याच्या गैरउद्देशाने प्रत्यक्षात खर्चाची शहानिशा न करता ज्या त्या महिन्यात प्रत्यक्ष खर्च झालेला नसल्याने बनावट खर्च दाखविण्यात आला व सर्व संबधित संचालक मंडळानी बहुमताच्या जोरावर तो मंजूर करून घेतला.

अहवालात दाखविलेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेला खर्च यात तफावत असल्याचे लक्षात आले.या विषयी माहितीच्या अधिकारात चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित चोपडा यांच्याकडे संचालक भरत विठ्ठल बाविस्कर यांनी मागणी केली असता त्यांना माजी आमदार व चेअरमन कैलास पाटील व इतर संचालक मंडळ यांनी संचालक पदावरून कमी केले.

मात्र भरत विठ्ठल बाविस्कर यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी शहर पोलिसस्टेशन चोपडा व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करुन आपला पाठपुरावा सुरुच ठेवला. तद्नंतर पोलिसांनी कार्यवाही न केल्यामुळे न्यायालयाकडे दाद मागितली . यावर न्यायायलाने 10 मे 2019 रोजी आर्थिक व्यवहाराच्या चौकशी करण्यास मंजुरी देत कैलास गोरख पाटील रा. कठोरा, प्रभाकर भिमराव पाटील, रा. वडगाव, कालीसाद चौधरी रा. श्रीराम नगर चोपडा, माधवराव पाटील रा. अनुर्वेद, भागवत पाटील रा. गोरगावले, प्रकाश पाटील रा. घोडगाव, रविंद्र पाटील रा. हातेड, तुकाराम पाटील रा. घुमावल, डिंगबर पाटील रा. सनपुले, रामराव चौधरी रा. अडावद, राजेंद्र पाटील तांदलवाडी, हितेंद्र पाटील रा. धानोरा, भालेराव पाटील रा. धुपे, शशिकांत पाटील रा. मालखेडा, राहुल बाविस्कर रा.हातेड, समाधान पाटील रा. चहार्डी, सौ. रंजना नेवे रा. देशपांडे गल्ली चोपडा, सौ. जागृती बोरसे रा. वेळादे, अशोक पाटील रा. वाळकी, सुनिल जैन रा. हिरा कॉटन, चोपडा, मितेश महाजन रा. सुतगिरणी चोपडा, पंढरीनाथ पाटील रा. घुमावल बु., सुकुमार काळे रा. सुतगिरणी चोपडा, सर्व संचालक ता.चोपडा जि. जळगाव यावर पोलिसांनी चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावे असे आदेश दिले. तसेच या संदर्भात स्वतंत्र चौकशी करून ऑडीट रिपोर्ट, अहवाल, प्रोसीडींग बुक इत्यादी सर्व तपासून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!