Type to search

maharashtra जळगाव

…तर चारा छावण्यांना तीन दिवसात मान्यता -ना.पाटील

Share
जळगाव । जिल्हयातील दुष्काळी परीस्थितीचा आढावा गेल्या आठवडयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉन्फरन्सव्दारे घेतल्यानंतर जिल्हा पालकसचीवांनी आढावा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेच पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगांव तालुक्यातील हिरापुर, वाघळी, पारोळा तालुक्यासह अमळनेर तांलुक्यातील प्रत्येकी दोन गावांना भेट देउन पाणी व चारा टंचाई निवारणाची स्थिती संदर्भात स्थानिक शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच गावपातळीवर विविध विकास कार्यकारी सोसायटया वा दुध विकास सस्थांनी चारा छावणीसाठी मागणी करून कागदपत्रांची पुर्तता केल्यास दोन तीन दिवसांत मान्यता देण्यात येईल. असे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात घेतलेल्या पत्रकर परीषदेत सांगीतले.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, जिल्हयात दुष्काळी परीस्थिती विषयी 9 गावांतील शेतकर्‍यांशी चर्चा करून पिण्याचे पाणी, वाढरव गरजांच्या नोंदी घेण्यात याव्यात, रोजगार, पाणी, चारा, याविषयी नविन पर्याय शोधले जावेत, चाराछावणी सुरू करण्यासाठी मोफत चारा पुरविता यावा यासाठी शेजारच्या राज्यांशी चर्चा करण्यात आली असून शेजारील अन्य जिल्हयात 9.50 हजार पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयात चारा व पाण्याचे टँकर लाबून आणावे लागत असेल तर स्थानिकपातळीवरी ल विकास सोसायटी, दुध सोसायटयांनी चारा छावणी साठी पुढे येणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस चारा छावणीचे निकष आहेत त्यात काही प्रमाणात शिथीलता आणता येईल का याविषयी देखिल प्रयत्न सुरू आहेत असे देखिल त्यांनी यावेळी सांगीतले.

रोजगार हमी मार्फत मजुरांना मागेल त्याला काम या उद्दीष्टाप्रमाणे पाणंद रस्ते, वा अन्य योजनेंतर्गत कामांना प्राधान्य दिले आहे. याअंतर्गत सुमारे 5 लाख मजुरांना रोजगार मिळाला आहे, यावेळी शेतकर्‍यांना हेक्टरी 6500रूपये दुष्काळी अनुदानासह पिक नुकसान भरपाईलाभ देण्यात आला आहे. कमी खर्चात पिकविमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यात येवून 3200 कोटी रकमेचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्हयातील बॅकांमार्फत शेतकर्‍यांना वाटप करण्यात येणार्‍या पिककजाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 15 मे पर्यत केवळ 3 टक्के खरीपपिक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली असून जिल्हा बॅकेसह अनेक बॅका कर्जमाफीनंतरचे वरील व्याज न दिल्यामुळे अजुनही शेतकरी थकबाकीदार दिसत असल्याने या बॅका शासन अध्यादेश असून सुद्धा अशा शेतकर्‍यांना व्याज भरण्यासाठी तगादे लावत आहेत. ज्या बॅकां शेतकर्‍यांना पिककर्ज देण्यात कसूर करतील त्यासंदर्भात 9 जुन अगोदर बॅकर्सची आढावा बैठक आयोजीत करण्यात येवून जिल्हाधिकारी यांचे कडून माहिती घेण्यात येईल असे देखिल सांगीतले. जिल्हयात दुष्काळी परीस्थिती निवारणासंदर्भात ज्या योजना सुरू आहेत त्या योजना पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

पालकमंत्र्यांनी दोन दिवस थांबावे
राज्यातील भीषण दुष्काळाचे गांर्भिय शासनात दिसून येत नसल्याने व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एका दिवसाच्या औपचारिक भेटी पेक्षा दोन दिवस थांबून दुष्काळ निवारणाबाबत निर्णय घ्यावा. त्यांच्या दोन दिवसांच्या भोजन व मुक्कामाचा खर्च मराठा क्रांति मोर्चा करेल असा ईशारा मराठा क्रांती मोर्चाने एका पत्रकाव्दारे दिला आहे. व याबाबतचे निवेदन खुद्द पालकमंत्र्यांना देखील देण्यात आले आहे. सद्यास्थितीत दुष्काळाची भीषण दाहकता लक्षात घेवून ज्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्या धरणांमधुन पाण्याची आवर्तने सोडण्यात यावीत. गावागावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. बागायती पीकांचे होणारे नुकसानापोटी शेतकर्‍यांना विशेष सानुग्रह अनुदान द्यावे. 24 तास विजेचा पुरवठा करण्यात यावा. यासह इतर मागण्यादेखील निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!