Type to search

maharashtra जळगाव

उपवन परीक्षेत्रात वन्यप्राणी गणनेसाठी पथके तैनात

Share
जळगाव । जिल्हयात वन्यजीव संस्था व वन अधिकार्‍याच्या पथकांतर्फे कृत्रिम व नैसर्गीक पाणवठयांवर लक्ष ठेवता येईल, अशा ठिकाणी जिल्हयातील वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा व डोलारखेडा या भागात 14 ते 15 मचाणी लावण्यात येवून प्रत्येक पथकाच्या सहभागातुन प्राण्यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे, जळगाव उपवनपरीक्षेत्रात प्रत्येकी तीन ते चार असे वनविभागातील कर्मचारीवर्गाचे पथके तैनात करण्यात आली आहेत.

यावलसह गौताळा संरक्षीत वनक्षेत्र अभयारण्य वाईल्डलाईफ सेंच्युरी भागात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाशात वन्यप्राणी गणना करण्यात येते.त्यानुसार शनिवार 18 मेच्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात चाळीसगांव, पाचोरा, एरंडोल पारोळा वनविभागातील अधिकारी कर्मचारी तसेच वन्यजीव संस्थेच्या सदस्यांना कोल्हा, तडस, नीलगाय, अस्वल, लांडगा, काळवीट दिसतील.

वढोदा क्षेत्रात वाघाचे दर्शन
वढोदा वनक्षेत्रात वाघ असल्याचे आधीच जाहीर झाले असले तरी, या परीसरात गेल्या काही महिन्यापूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पायात ठिबकच्या नळया अडकलेल्या अवस्थेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना होती. या परीसरात इतर वन्यप्राण्यासोबतच काळवीट व नीलगायींच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज वन अधिकार्‍यांनी व्यक्त केला असून, येत्या चार पाच दिवसात सविस्तर आकडेवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक कार्यालय सूत्रांनी दिली आहे.

यावल व जळगांव वनपरीक्षेत्रातील वन्यजीवांची गणना मे महिन्यात बौद्ध पौणिमेच्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाशात करण्यात येते. यावर्षी यावल वनपरीक्षेत्रासह जळगांव विभागातील जळगांव, पाचोरा, पारोळा, चाळीसगांव आदी उपवनपरीक्षेत्रात वन्यप्राणी गणनेसाठी कृत्रिम तसेच नैसर्गीक पाणवठयांच्याजवळ मचाणांसह सुमारे 55 ते 60 जणांची पथके तैनात केली आहेत.
-दिगंबर पगार, उपवनसंरक्षक, जळगाव.

रिझर्व वाईल्ड लाईफ सेंच्युरी येथे वन्यप्राण्यांची गणना दरवर्षी करण्यात येते, त्यानुसार यावल, चोपडा, रावेर वनपरीक्षेत्रात देखिल वन्यप्राणी गणना करण्यात येणार आहे. या वनपरीक्षेत्रात सुमारे 28 ते 30 कृत्रिम पाणवठयांजवळ मचाणांवर पथके तैनात करण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत वन्यप्राणी गणना करण्यात येणार आहे.
प्रकाश मोराणकर, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!