Type to search

शिवाजीरोड, सुभाष चौक परिसरात अतिक्रमणात ‘पुढे पाठ, मागे सरसपाट’

maharashtra जळगाव

शिवाजीरोड, सुभाष चौक परिसरात अतिक्रमणात ‘पुढे पाठ, मागे सरसपाट’

Share
जळगाव । प्रशिवाजीनगररोड तसेच घाणेकर चौक, सुभाष चौक परिसरात अतिक्रमण विभागाने शुक्रवारी दिवसभर ठाण मांडून रस्ते मोकळे केले. मात्र अतिक्रमण पथक चालते झाल्यानंतर अतिक्रमणधारक दुकानदार, हातगाडी व्यावसायिक पुन्हा त्याच जागी येवून पुढे पाठ, मागे सरसपाट… याप्रमाणे अतिक्रमण करीत असल्याचे दिसून आले.

अतिक्रमण विभागाने शुक्रवारी दिवसभर ठाण मांडून शिवाजीनगर रोड तसेच घाणेकर चौक, सुभाष चौक परिसरात रस्ते मोकळे केले. याकामी अतिक्रमण हटाव पथकात विभागाचे प्रमुख एच. एम. खान यांचेसह नाना कोळी, विजय देशमुख, साजीद अली, आर. टी. पाटील, परदेशी, किशोर सोनवणे आदींचा समावेश होता.

कडक कारवाईची गरज
आठवड्यातून किमान दोन तीनदा अतिक्रमणाचे पथक या ठिकाणी येते व येथील रस्ते मोकळे करुन जाते. मात्र व्यावसायिक पुन्हा ठाण मांडून रस्तावर बसतात पुन्हा स्थिती जैसे थे होवून जाते. या नेहमीच्या प्रकारामुळे अतिक्रमण विभागाचे पथकही हतबल होवून जाते. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या कार्यकाळात अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करण्यात आली होती. अर्ध्यावर शहरात अतिक्रमण काढण्यात आले होते मात्र त्यांची बदली झाल्याने ही कारवाई शिथिल झाली. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणधारक, व्यावसायिकांनी पुन्हा डोके वर काढले. त्यासाठी कडक कारवाईची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!