Type to search

maharashtra जळगाव

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा, मागेल त्याला काम द्या!

Share
जळगाव । जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चारा आणि मागेल त्याला काम देण्यास प्राधान्य देण्यासह टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव राजेश कुमार यांनी त्यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या पाणी व चारा टंचाई यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजनप्रसंगी दिले.

पालक सचिव राजेश कुमार पुढे बोलतांना म्हणाले की, टंचाई आराखड्यानुसार जिल्हयातील 1 हजार 9 गावांना टंचाई जाणवू शकते. अशा परिस्थितीत या गावांचे सर्वेक्षणानुसार टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे सर्वेक्षण करुन 7 दिवसात अहवाल सादर करावा. तसेच विंधन विहिरी व कुपनलिका घेण्यासाठी पुरेशी जलपातळी असलेली ठिकाणी निश्चितीकरण, टंचाई कालावधीत महावितरणने पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी खंडीत करु नये. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाहणी करुन टँकर भरण्यासाठी पर्यायी उद्भव निश्चित करुन ठेवावे. सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी उद्भवही शोधून ठेवावे. आवश्यकता भासल्यास विंधन विहीर, कुपनलिका अधिग्रहण करुन त्या सील करुन ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

चारा छावणी सुरु करण्याबाबत मागणी आल्यास मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार कृउबा समितीमार्फत चारा छावण्याचे नियोजन,मागणीनुसार तात्काळ कामे,गाळ काढण्याच्या कामांमध्ये पाणी पुरवठ्याचे स्त्रोत प्राधान्याने घ्यावेत. मग्रारोहयो अंतर्गत वनीकरण, रोपवाटीका इत्यादीची कामे तात्काळ सुरु करावी. यामुळे टंचाई कालावधीत हातांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील भविष्यातील तीव्र स्वरुपाची पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा. रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील भूजल पातळीबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग यांनी एकत्रित समन्वयानेे नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील पर्जन्यमान, जलसाठे, पाणी पुरवठ्याच्या इतर योजनांचा आढावा घेवून टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरीकांंच्या सुचना,तक्रारी दाखल करण्यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा असेही त्यांनी सांगीतले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जि. प.सीइओ. डॉ. बी.एन. पाटील, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, मोराणकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, अतिरिक्त सीइओ संजय म्हस्कर, लघुपाटबंधारे अधिक्षक अभियंता बी. ए. चौधरी, उप कार्यकारी अभियंता कि. न. अटाळे, डिआरडीएचे पी. सी. शिरसाठ, तहसिलदार मंदार कुलकर्णी आदि अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!