Type to search

maharashtra जळगाव

टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा!

Share
जळगाव । जिल्ह्यातील दुष्काळी व टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

डॉ.ढाकणे पुढे म्हणाले की, सध्या राज्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या टंचाईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद देखील साधला आहे. त्यानुसार सूचना व तक्रारीवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाण्यास प्राधान्य असून जिल्ह्यातील जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यात देत आहे. याशिवाय ज्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामांची मागणी येईल, तेथे तातडीने कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडेल. कमी पाऊस पडलाच तर सर्व नागरिकांनी मिळून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून पाण्याचा जपून वापर करावा व भविष्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी नागरिकांनी पाण्याचे महत्व जाणून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा. वापरलेले पाणी आपल्या घराशेजारील शोषखड्डा करून जमिनीतच मुरवून गावातच जिरवावे. जेणेकरुन गावातल्या कुपनलिकांना पाणी उपलब्ध होईल. तसेच गावात वृक्षलागवडीसाठी प्राधान्य देऊन झाडे वाढवावीत. याशिवाय सर्व नागरिकांनी पाणी नियोजनामध्ये आपला सहभाग नोंदवावा.

जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरची संख्या दोनशेवर!
जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला असून भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या 200च्या वर पोहचत आहे. अडचणीच्या परिस्थितीतही नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!