Type to search

maharashtra जळगाव

जिल्हा बँकेच्या ग्रामीण शाखांत सर्व्हर डाऊनमुळे व्यवहार ठप्प

Share
जळगाव । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्रामीण भागातील अनेक शाखात सद्य:स्थितीत सर्व्हर डाउनमुळे गेल्या चार दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.त्यामुळे शेतकर्‍यांना ऐन दुष्काळी परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे जिल्हयातील शेतकरी विशेष दुष्काळाचा सामना करीत असतांनाच जिल्हा बँकेच्या सर्व्हर डाउनमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे. जिल्हा बँकेने सर्व कामकाज सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. ऑनलाईन पद्धतीने होणारे व्यवहार हे सर्व इंटरनेट कनेक्शनच्या भरवशावर असल्याने बर्‍याच ठिकाणी बीएसएनएलचे इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. मात्र ज्या ठिकाणी बीएलएनएलची सुविधा नाही तेथे रिलायन्स आणि एअरटेल सोबत टायअप करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मात्र रिलायन्स जिओ इंटरनेटचा बर्‍याचदा रेंज मिळण्यास मोठी अडचण निर्माण होते. सद्या याच अडचणींचा सामना जिल्हा बँकेच्या शाखांना करावा लागत आहे. अनेक शेतकर्‍यांनी विकास सोसायटीमार्फत खरीप पिककर्ज रिनीवल करून घेतले आहे तर अनेकांना कर्जाचे पुनर्गठन केले आहे. मात्र सर्व्हर डाउन असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक व्यवहार करणेत अडचणी निर्माण होत आहे.

जिल्हा बँकेच्या बहुतांश शांखांमध्ये बीएसएनएल इंटरनेट जोडणी आहे. जेथे बीएसएनएल रेंज मिळत नाही अशा मोजक्याच ठिकाणी इतर इंटरनेट जोडणी आहे. ग्राहकांच्या अडचणी निवारण करण्याच्या संबंधित शाखाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– जितेंद्र देशमुख,
कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक,जळगांव.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!