Type to search

माजी खा.जैन यांच्यासह गफ्फार मलिक, रवींंद्र पाटलांची न्यायालयात हजेरी

maharashtra जळगाव

माजी खा.जैन यांच्यासह गफ्फार मलिक, रवींंद्र पाटलांची न्यायालयात हजेरी

Share
जळगाव । रास्तारोको, थाळीनाद आंदोलन करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसात जमावबंदी कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात मंगळवारी दुपारी माजी खा. ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर, परेश कोल्हे, वाल्मिक पाटील, मंगला पाटील, मिर नाजीम मलिक या आठ जणांनी न्या. शेख यांच्या न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर या सर्वांना प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आला.

बचावपक्षातर्फे अ‍ॅड. कुणाल पाटील, अ‍ॅड. इमरान हुसेन, अ‍ॅड. अजिम शेख यांनी कामकाज पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!