Type to search

maharashtra जळगाव

प्लास्टिक प्रदूषणामुळे पशु-पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

Share
जळगाव । प्लास्टिक प्रदुषणामुळे नदी, तलावांमध्ये प्रदूषण निर्माण होवून पशू-पक्ष्यांच्या अधिवासावर संकट आले आहे. परिणामी प्लास्टिक व प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. प्लास्टिक प्रदूषणावर प्रभावी उपाय योजना तातडीने करण्याची गरज आहे.

प्लास्टिक प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐराणीवर आला आहे. प्लास्टिकमुळे माती आणि पाणी प्रदूषित होऊन पशू-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती बाधित झाल्या आहेत. प्लास्टिक कचर्‍यामुळे समुद्र, नद्या, ओढे यासारखे जलस्त्रोतावर येणार्‍या पाणथळ पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत आणि त्यांच्या जातीही संकटग्रस्त झाल्या आहेत. 90 टक्के समुद्र पक्ष्यांच्या शरीरात प्लास्टिकचे अंश सापडले आहेत. 2050 पर्यंत हे प्रमाण 99 टक्क्यांवर पोहचेल असे संशोधनातून पुढे आले आहे.
जळगाव शहरातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मेहरूण तलाव, शिरसोली तलाव, मन्यारखेडी तलाव, गिरणा नदीकाठचे निमखेडी आणि सावखेडा शिवार हे पाणथळ पक्ष्यांचे मुख्य अधिवास आहेत. जळगावामध्ये हिवाळ्यात येणार्‍या देशीविदेशी पाणथळ स्थलांतरित पक्ष्यांच्या दृष्टीने हे जलस्त्रोत खूप महत्वाचे आहेत. प्लास्टिक कचर्‍याने या सर्व स्त्रोताना मगरमिठी घातली आहे. सन 2010 ते आतापर्यंत 25 स्थानिक आणि 45 विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांची नोंद झाली आहे.

देशीविदेशी मिळून 35 प्रकारचे पाणथळ जातीचे पक्षी कमी अधिक संखेने या तलावावर आणि गिरणेवर येतात. यात विविध जातीचे नियमित येणारे पाणथळ पक्षी जसे बदक, तुतारी, पाणलाव, तुतवार हे आहेत. तर मोठा रोहित आणि काळ्या डोक्याचा व तपकिरी डोक्याचा कुरव हे अचानक आढळलेले पक्षी. फक्त पाणथळच नव्हे तर काही शिकारी पक्षी जसे कैकर, बहिरी ससाणा, अगदी छोटे माशिमार हे देखील मेहरूण तलाव काठी आढळून आले आहेत. कारण पाणी हे सर्वच सजीवांसाठी रोजची गरज आहे. पण वेगाने घटणारी पाणी पातळी, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा यामुळे यांची संख्या दरवर्षी घटते आहे.नवीन प्रजाती या ठिकाणी येतात पण तलावात पाणी नाही त्यामुळे अन्न मुबलक नाही ते पाठ फिरवतात. म्हणूनच प्लास्टिक प्रदूषण व अन्य प्रदूषके हटवणे गरजेचे आहे.या जलस्त्रोतांचे संवर्धन आणि संरक्षणसाठी जलद गतीने उपाय योजना करणे ही तातडीची गरजेचे आहे.

जीवसृष्टी सुखी तर आपण सुखी. म्हणूनच आपण सर्वांनीच पक्षी संवर्धनासाठी त्यांच्या अधिवास संरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे.
– शिल्पा गाडगीळ, पक्षीमित्र

पक्षी निरीक्षण व गणनेत सामील व्हा!
जागतिक स्थलांतरित पक्षीदिन दि.11 रोजी आहे. निसर्गमित्रतर्फे मेहरुण तलाव येथे सकाळी 6.30 ते 7.30 पक्षी निरीक्षण उपक्रम घेण्यात आला आहे. गावचे ड्रेनेज मेहरूण तलावात सोडल्याने तलावावरील पक्षी जीवन धोक्यात आले आहे. मेहरूण तलाव वाचल्यास किमान 95 प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांना जीवदान मिळणार आहे. नागरिक बंधू, भगिनींनी, युवक, युवतींनी सेंट टेरेसा शाळेजवळ सकाळी 6.25 पर्यंत यावे असे अवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले आहे. सहभागी होतांना सोबत वही-पेन, पाणी, दुर्बीण व कॅमेरा असल्यास आणावा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!