Friday, April 26, 2024
Homeजळगावमहिलांनी शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे : ‘सखी घे भरारी’ कार्यक्रमप्रसंगी...

महिलांनी शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे : ‘सखी घे भरारी’ कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे प्रतिपादन

जळगाव | प्रतिनिधी

स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे, संध्याकाळी दोन तास सहजच व्हॉट्सऍप बघण्यात जातात, त्याऐवजी पुस्तके वाचा, त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल, असे ‘सखी घे भरारी’ या ग्रुपद्वारा ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’.  या कार्यक्रमप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी प्रतिपादन केले.

- Advertisement -

रविवार दि.५ रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जिल्हा क्रीडा अधिकारी रेखा पाटील, तसेच  कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी निर्भया पथकाच्या अध्यक्षा मंजु तिवारी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आहे. निर्भया पथकाच्या प्रमुख मंजु तिवारी म्हणाल्या की, महिलांनी भारतीय संस्कृती जपावी. मुलांनी घरातील तसेच समाजातील स्रियांचा सम्मान करावा.

विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक- धावणे पहिला  गट-प्रथम- दिपाली पाटील, द्वितीय -आयेशा खान, दुसरा गट-प्रथम  डॉ. रुपाली बेंडाळे, द्वितीय- डॉ. मेघना नारखेडे, तृतीय-नैनश्री चौधरी ,तीसरा गट- विद्या बेंडाळे, चालणे- पहला  गट-डॉ. विद्या पाटील, शोभा राणे, नीता वराडे, नलिनी चौधरी,   सिंधु भारंबे, दोरी उड्या-  दिपाली पाटील, भारती पाटील, नयना सचिन चौधरी, शशिकला बोरोले यांनी ७०व्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केल्यामुळे विशेष बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयंती चौधरी, ऍड. भारती ढाके,  डॉ. निलम किनगे,  भारती चौधरी, डॉ. स्मिता पाटील, सोनाली पाटील,  दिपाली पाटील, कांचन राणे वनिता चौधरी, वैशाली कोळंबे, उषा राणे, संगीता रोटे, पो.कॉ. प्रवीण सोनवणे, गणेश पाटील, सुजल भोसले, कल्पना लोखंडे, डॉ. एकता चौधरी, रजनी पाटील, शीतल भैया यांनी  परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या अट्रावलकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या