Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

‘घरकुल’चे सर्व कामकाज मुंबई खंडपीठात

Share

जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांचे जमीन अर्जापाठोपाठ औरंगाबाद खंडपीठात असलेलेल सर्वच कामकाज मुंबई खंडपीठात वर्ग करण्याचे आदेश मुंबई खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्तीनी दिले आहेत. त्यामुळे आता या घोटाळ्यातील आरोपींच्या  मुंबई फेर्‍या वाढणार आहेत.

घरकुल घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेले माजी आमदार सुरेश जैन यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केल्यानंतर या अर्जावर औरंगाबाद खंडपीठ वगळता देशातील कोणत्याही खंडपीठात कामकाज घेण्यात यावे असा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. दरम्यान या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येऊन सर्वोच्च न्यायालयाने जैन यांच्या जमीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या  अर्जावर मुंबई खंडपीठाच्या प्रधान पीठापुढे कामकाज घेण्याचे आदेश दिले होते .

दरम्यान या प्रकरणातील काही अर्जावर औरंगाबाद खंडपीठात कामकाज सुरु असल्याने आरोपी तसेच वकिलांची होणारी हेलपट बघता विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मुंबई खंडपीठाच्या प्रमुख न्यायमूर्तीकडे घरकुल घोटाळ्याचे सर्वच कामकाज मुंबई खंडपीठात वर्ग करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर प्रमुख न्यायमूर्तीनी औरंगाबाद खंडपीठाकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रमुख न्यायमूर्तीनी सर्वच कामकाज मुंबई खंडपीठात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यामुळे आता आरोपींच्या मुंबई फेर्‍या वाढणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!