Type to search

जळगाव

जिल्ह्यात 13 आमदार; अधिकार मात्र दोघांनाच

Share

अमळनेर । राजेंद्र पोतदार

जळगाव जिल्ह्यात 13 आमदार आहेत. मात्र 11 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला नसल्याने त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही तसेच बैठकाही घेऊ शकत नाही. यामुळे सध्या जिल्ह्यात दोनच आमदार आहेत.

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान तर 24 रोजी निकाल लागले. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेेंबर रोजी संपला. त्यानंतर नवीन सरकार स्थापन न होऊ शकल्याने आमदांचा शपथविधी झाला नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. यामुळे नव्याने निवडून आलेले आमदारांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध झाले. परंतु, शपथविधी झाला नाही, यामुळे त्यांना आमदारकीचे अधिकार अद्याप मिळाले नाही. त्यांना आमदार निधी, वेतन भत्ते मिळत नाही किंवा बैठका घेता येत नाही. यामुळे सध्या 13 पैकी अमळनेरच्या सौ.स्मिता वाघ व जळगावचे चंदूलाल पटेल हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांचे सर्व अधिकार अबाधित आहे. आमदार वाघ यांची नियुक्ती 23 जानेवारी 2015 रोजी झाली तर त्यांची मुदत 24 एप्रिल 2020 रोजी पूर्ण होत आहे. आमदार चंदूलाल पटेल 6 डिसेंबर 2016 रोजी आमदार झाले तर त्यांची मुदत 5 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण होत आहे.

जळगाव जिल्हयातील अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमच निवडून आले आहेत. चोपड्यात आमदार लताबाई सोनवणे, चाळीसगावात मंगेश चव्हाण तर मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील प्रथमच सभागृहात जात आहे. 11 आमदार अद्याप जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नाही. यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. अधिकार्‍यांच्या बैठका घेवू शकत नाही. कोणतेही आदेश आमदार म्हणून देऊ शकत नाही. त्यामुळे जनतेने त्यांना मोठ्या आशेने निवडून दिले मात्र राज्यातील राजकीय तिढ्यामुळे त्यांचा नाईलाज आहे. नवनिर्वाचित आमदार लेटरपॅडही छापू शकत नाही. आता राष्ट्रपती राजवट कधी संपेल? याची वाट नवीन आमदारांना पाहावी लागत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!