Type to search

जळगाव

रिक्षांमध्ये फ्रंटसीट प्रवाशी वाहतुकीला ऊत; रिक्षाचालकांची वाढतेय मुजोरी

Share

जळगाव । शहरातील रिक्षाचालकांविरुद्ध इतर वाहनचालक आणि पादचार्‍यांच्या तक्रारींचा सूर वाढतच आहे. रिक्षांमध्ये फ्रंटसीट प्रवाशांना बसवण्याचे प्रकार पुन्हा वाढल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहेत. तर अनेक रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे दररोज छोट्या-मोठ्या वादाला तोंड फुटतेय. तर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना कठीण होतय.

शहरात फ्रंटसीट वाहतूक करणार्‍या रिक्षांमधील पुढील बेकायदा सीट काढून घेण्याची मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राबवली. त्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला सुमारे दीडशे रिक्षांमधील अवैध फ्रंटसीट काढण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा 40 रिक्षांमधील फ्रंटसीट काढून संबंधितांविरुद्ध कारवाई झाली. या कारवाईसत्रानंतर काही दिवस पोलिसांचा वचक निर्माण झाला. पोलिसांच्या दबदब्यामुळे पोलिसांनी काही दिवस रिक्षाचालकांना शिस्त लागली. नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’निर्माण झाली. यासंदर्भात तक्रार करुनही फारसा फरक पडत नसल्याने नागरिकांनी तक्रार करणे सोडून दिल्यासारखे झाले आहे.

ध्वनी व वायू प्रदूषण

असंख्य रिक्षाचालक विनाकारण हॉर्न वाजवत असल्याने रस्त्यावरील इतर वाहनचालक अथवा पादचार्‍यांचा गोंधळ होतो.   तसेच प्रवाशी मिळवण्याच्या घाईत ते मागील वाहनचालकांचा काहीही विचार न करता रिक्षाला टर्न करुन प्रवाशांच्या दिशेने जातात. त्यामुळे मागील वेगातील वाहनचालकांचे वाहन रिक्षावर आदळल्याचे अनेक प्रकार आहेत. तर नजीकच्या  पादचारी अथवा अन्य वाहनचालकांना कट मारण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढताय. त्यामुळे निर्माण होणारे वाद प्रसंगी हातघाईवर जात आहेत. तसेच शहरातील बहुसंख्य रिक्षा रॉकेलवरच धावत असल्याने  त्यातून निघणार्‍या धुरामुळे इतरांना प्रचंड त्रास होत आहे. हा धूर सर्वसामान्यांना दिसतो, तर पोलीस आणि आरटीओंना दिसत नाही का? असा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. या वायूप्रदूषणाकडे संबंधितांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्या रिक्षामधील प्रवाशांसह इतरांना भोवळ येणे, मळमळ होणे, असा त्रास होत आहे.

पुन्हा कारवाई होणार

फ्रंटसिटचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. ही मोहीम पुन्हा हाती घेण्यात येईल. वायू प्रदषूण करणार्‍या जुन्या सहा रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या असून त्या तोडण्यासाठी आरटीओची परवानगी घेण्यात येत आहे.   -देवीदास कुनगर,

      निरक्षक, वाहतूक शाखा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!