Type to search

जळगाव

सात दिवस होऊनही पंचनाम्यांना नैसर्गिकअडथळ्यांमुळे उशीर

Share

जळगाव । जिल्हा परिसरात यावर्षी ऑक्टोबर अखेर पर्यत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. विभागीय स्तरावरून सात दिवसांत पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु नैसर्गिकअडथळयांमुळे अजुनही सुमारे 50 हजार हेक्टरच्या जवळपास पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनाम्याचे कृषी क्षेत्र अजुनही वाढू शकते, असा अंदाज कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिसरात ऑक्टोबर अखेर पर्यंतच्या झालेल्या पावसामुळे मोठया प्रमाणावर ज्वारी, बाजरी, मका तसेच कापसाच्या उत्पादनाचे नुकसान झाले आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून 15 तालुक्यांचे 6 लाख, 1 हजार, 307 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेले असल्याचे नजर अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होेता. त्यात आजअखेर अमळनेर 41343 हेक्टर (52376 शेतकरी), चोपडा 55865 (51800), एरंडोल 30690(26786),धरणगांव 22182(21373), पारोळा 44683(45202),जळगाव47685(35613,भुसावळ 25051(19750),बोदवड 26127(29785),यावल41085(42620),रावेर25304(26273),मुक्ताईनगर28736(29415), भडगाव 37058(37000), चाळीसगाव 76408(70221), जामनेर 98253(65843), पाचोरा 59890(52387) एकूण  6 लाख 63 हजार 360 हेक्टरवरील पंचनामे पुर्ण झालेले क्षेत्र आहे. यात आजपर्यत 6 लाख 6हजार 444 शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनाचे नुकसान पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पंचनामे करताना पीक विमा कंपनी, कृषी विभागाचे प्रतिनिधींच्या समन्वयातून पंचनामे पूर्ण केले जात आहेत. 14 नोव्हेंबरपर्यंत जळगाव, बोदवड, अमळनेर, चोपडा, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा आदी तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतील, असा अंदाज आहे.          -अनिल भोकरे, 

कृषी उपसंचालक

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!