Type to search

जळगाव

अतिवृष्टीमुळे कृषी उत्पादनावर परिणाम

Share

जळगाव । जिल्ह्यात 19 ठि

काणी शासकीय धान्य खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण शेवटच्या टप्प्यात मोठया प्रमाणावर होते. त्यामुळे बहुतांश उत्पादन शेतातच कापणी अवस्थेत असतांना मातीमोल झाले आहे. पर्यायाने परंतु या खरेदी केंद्रांवर सद्य:स्थितीत धान्याची आवक अगदी नगण्य अशीच आहे. जी आवक होत आहे त्यात देखील पाण्याने काळी पडलेली ज्वारी, बाजरी, मका आदी उत्पादन येत असून या शेतमालाचा उठाव  होत नसून व्यापार्‍यांकडून मातीमोल भाव दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.तर काही ठिकाणी हा काळा पडलेला शेतमाल खाद्यान्नाऐवजी पशुखाद्य कारखान्यात उपयोगात आणण्यासाठी काही व्यापार्‍यांकडून खरेदी केली जात आहे.

जिल्ह्यात शासनातर्फे जामनेर, जळगाव, आदींसह 19 केंद्रांना भुसार माल खरेदी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या अगोदरपासूनच जिल्हापरिसरातील धान्य खरेदी केंद्रावर शेतमालाची मोठया प्रमाणावर आवक होते परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी कृषी उत्पादन शेतमालाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने धान्य काढणीला सवडच मिळाली नाही. पर्यायाने ज्वारी, बाजरी, मका शेतातच सडल्यामुळे कृउबात आवक कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत दरदिवशी दसरा दिवाळी पर्वात शेतमालाची दररोज 15 ते 20 ट्रॅक्टरसह बैलगाडयांमधून देखील मोठया प्रमाणावर आवक होत होती. परंतु यावर्षी आतापर्यंत केवळ दिवसाला 5 ते 7 ट्रॅक्टरव्दारे शेतमालाची आवक झाली आहे. दिवाळीनंतर 1 नोव्हेंबरपासून बाजार समितीचे नियमित कामकाज सुरू झाले आहे.  शासकीय धान्य खरेदी केंद्रावर आवक किती होईल हे सांगता येणे कठीण आहे.

-आनंदा मगर, 

मापाडी, कृउबा

कृषि उत्पन्न बाजार समितीत दररोज 4ते 5हजार क्विंटल मक्याची आवक होत होती तेथे आज 11 नोव्हेंबर रोजी केवळ 1100 ते 1500 क्विटल मका आवक झाली असून दर 600 पासून तर 1800 रूपये प्रति क्विंटल आहेत. ज्वारी 200ते 250 क्विटल आवकसह 1100 ते 1300रूपये, बाजरी 2200ते 2300रूपये, सोयाबीन 1200पासून 3800रूपये प्रति क्विटंलचे दर आहेत. या वर्षी अतिपावसामुळे सुमारे 80 टक्के उत्पादन डिसकलर झाले असून आवक देखिल कमी प्रमाणात आहे. कृउबाचे व्यवहार नियमित सुरू झाले असून शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीस आणावा.

-बी.एस.देवरे, उपसचिव कृउबा पाचोरा. 

काळा उडीद उत्पादनास शासकिय दर 5700 रूपये प्रति क्विंटल आहे.   उडीदाची आवक 1हजार ते1200 क्विंटल, सोयाबीन 500 ते 700 क्विटल असून 3200 ते 3500रूपये प्रति क्विटल दर  आहेत. जळगाव कृउबात मोठया प्रमाणात चढाओढीचे दरानुसार 3500 ते 6500 रूपये प्रति क्विटल दर मिळत असून शेतकर्‍यांनी या दराचा लाभ घ्यावा.

-कैलास चौधरी, सभापती. कृउबा.जळगाव  

उत्पादन कापणी करून काढणीच्या अवस्थेत होते.   संततधार पावसामुळे बहुंतांश उत्पादन वाया गेले आहे.  त्यामुळे  ट्रॅक्टरसह अ‍ॅपे, बैलगाडी चालक ज्यांच्या वाहनातुन जळगाव कृउबात शेतमालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात होत नााही. पर्यायाने हमाल, मापाडी, यांचेसह शेकडो हातांना काम मिळत नसल्याने आजमितीस बेरोजगार आहेत.        -पंढरीनाथ चौधरी, रोजंदारी कामगार. कृउबा 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!