Type to search

maharashtra जळगाव

मालमत्ता कराचा विक्रमी भरणा

Share
जळगाव । मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज सायंकाळपर्यंत प्रभाग समिती क्र.1,2,3 मिळून रोख व चेक स्वरुपात एकूण 87 लाख 16 हजार 135 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. यात नेहमीप्रमाणे आजही प्रभाग समिती क्र. 1 हीच अव्वल असल्याचे दिसून आले.

आज मालमत्ता कर भरण्यासाठी मनपासह गिरणा टाकी परिसरात प्रभाग क्र. 4 साठीही गर्दी झाली होती. तसेच प्रभाग क्र. 2, 3 यामधूनही गुरुवार 25 रोजी चांगल्यापैकी वसुली झाल्याचे संबंधित प्रभाग समितीप्रमुखांकडून माहिती मिळाली.

4 ते 5 काउंटर सुरू
10 टक्के रिबिट हा 30 एप्रिल पर्यत लागू केल्याने या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी नागरिकांनी आज मनपाकडे करभरणा भरण्यासाठी मनपात एकच गर्दी होती. या कक्षात यात्रेचे स्वरुप आलेले होते. या कक्षात नेहमी एक खिडकी सुर रहात होती. मात्र बुधवारी नागरिकांची वाढती गर्दी पाहता जवळपासस 4 ते 5 काउंटर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहेत असेही सोनवणी यांनी सांगितले.े

रिबिटचा लाभ
10 टक्के रिबीटची मुदत ही 30 एप्रिलपर्यंतच असल्याने त्यानंतर भरणा करणार्‍यांना ही स्किम लागू होणार नाही. तरी रिबिटचा लाभ करुन घ्यायचा असेल तर 30 एप्रिल पर्यत भरणा करा असे आवाहन मनपा वसुली विभागातर्फे करण्यात आले होते.

जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव
थकित मालमत्ता कर धारकांकडून जवळपास 300 ते 400 मालमत्ताधारकांची मालमत्त्ता जप्त करण्यात आली आहे. वसुली वेळेत न भरु शकल्याने व वारंवार सूचना देवूनही ही वसुली वसूल झाली नाही. यापैकी किमान मोठमोठ्या 7 ते 8 लीलाव लवकरच करण्यात येतील असेही विलास सोनवणी यांनी
सांगितले.

प्रभाग क्र. 1
प्रभाग समिती क्र. 1 करवसुलीत नेहमीच अव्वल असते आजही रोख व चेक स्वरुपात 46 लाख 30 हजार 135 रुपयेची वसुली करण्यात आली. आज मात्र नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता किमान चार ते पाच काउंटर सुरू करण्यात आले आहे.

प्रभाग क्र. 2
तर प्रभाग समिती क्र. 2 ची आजची वसुली ही रोख 10 लाख 6 हजार तर चेक स्वरुपात 4 लाख 30 हजार असे एकूण 14 लाख 36 हजार रुपये ची वसुली करण्यात आल्याचे प्रभाग समिती प्रमुख संजय पाटील यांनी सांगितले.

प्रभाग क्र. 3
तर प्रभाग समिती क्र. 3 ची आजची वसुली ही रोख 20 लाख तर चेक स्वरुपात 6 लाख 50 हजार असे एकूण 26 लाख 50 हजार रुपये ची वसुली करण्यात आल्याचे प्रभाग समिती प्रमुख सुशील साळुंखे यांनी सांगितले.

प्रभाग क्र. 4
तर प्रभाग समिती क्र. 4 ची आजची वसुली ही अंदाजे 15 ते 20 लाखापर्यंत झाली असल्याचे मनपा सुत्रांकडून समजते याबाबत चौकशी केली असता, संबंधीत विभागप्रमुखांशी संपर्क होवू शकला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!