Type to search

जळगाव

तलाठी बच्छावसह कोतवालाने लाज सोडली

Share

नगरदेवळा । वार्ताहर- ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसाने  शेतकरी हवालदिल आहे. सरकारकडून पंचनामे सह नुकसान भरपाईची वाट पाहत आहे, असे असतांना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावातील तलाठ्यासह कोतवालाने  शेतकर्‍यांच्या शेतातील पंचनामे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा संताप जनक प्रकार नगरदेवळा येथे गुरुवार रोजी उघकिस आला. या कारवाईने  खळबळ उडाली आहे.

तक्रारदार (नाव गोपनीय) शेतकरी  वय-29 वर्ष रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांच्या शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते. अवकाळी पावसामुळे पिक पेरा नावे लावून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पैस्याची मागणी झाली होती असे समजते.? त्यामुळे तक्रारदार याने एसीबी जळगाव यांचेकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर लाचखोर तलाठी  मिलिंद जयवंत बच्छाव ( वय-55) हल्ली रा.कजगाव ता. भडगाव व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (वय-45) रा. नगरदेवळा यांना लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे.

हा सापळा एसीबीचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि नाशिक, निलेश सोनवणे , अप्पर पोलिस अधिक्षक ला.प्र.वि नाशिक, जी.एम.ठाकुर पोलिस उपअधिक्षक, संजोग बच्छाव पोलिस निरिक्षक, सफौ- रविंद्र माळी, पोकॉ. प्रशांत ठाकुर, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ महेश सोमवंशी ला. प्र. वि. जळगांव यांच्या पथकाने यशस्वी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!