Type to search

maharashtra जळगाव

जळगावातून ‘लाखाचा’ लीड देण्याचा दावा ठरणार ‘फोल’

Share
जळगाव । शहरासह जिल्ह्यात युती आणि महाआघाडीच्या उमेदवारांसाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सभांमधून जळगावातून उमेदवारांना लाखाच्यावर लिड देण्याचा दावा केला. मात्र मंगळवारी जळगाव शहरातून झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा निरुत्साह आणि अल्प प्रतिसादामुळे नेत्यांचा हा ‘लाखांचा’ दावा फोल ठरतो की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

राज्यात बहुचर्चित जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघामध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत सर्वाधिक मतदान मिळवून विजयी होण्याचा दावा जिल्ह्यात झालेल्या सभांमधुन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अंदाज बांधला होता. त्या दृष्टीने नेतेही ठाण मांडून बसले होते. मात्र शहरातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास अल्प प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा नसल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुनही शहरात मतदानाची पन्नाशीच्यावर टक्केवारी गाठता आली नाही.

शहरासह ग्रामीण भागात सोशल मीडियाव्दारे निवडणूक प्रशासनाने जनजागृती केली होती. तसेच शहरात मतदान करण्याविषयीचे कटआऊटही लावण्यात आले होते. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे मतदार घराबाहेर पाहिजे त्या प्रमाणात घराबाहेर पडले नाहीत.

राजकीय नेत्यांनी शहरातून लाखाच्या वर उमेदवारांना मतदान देण्याचा दावा केला होता. मात्र मतदारांमध्ये निरुत्साह आणि अल्पप्रतिसादामुळे कमी झालेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याविषयी चर्चांना उधान आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!