Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

देशदूत कर्मचार्‍याचा प्रामाणीकपणा; रस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत

Share

जळगाव । आजच्या काळात बहुतांश लोक फक्त आपल्यापुरताच विचार करतात. आपला फायदा दिसत असताना कुणाला एखाद्याच्या नुकसानाची पर्वा नसते. महागड्या मोबाईलचे तर आजच्या काळात चांगलेच फॅड निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणालाही मोबाईल हवाहवासा वाटतो. कधी मोबाईल हरविला तर तो आपला नव्हेच म्हणुन सोडून द्यावा लागतो. मात्र दै.देशदूतचे कर्मचारी प्रकाश भावसार हे दि.3 रोजी सायंकाळी कामावरून घरी जात असताना त्यांनी रस्त्यात सापडलेला मोबाईल संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचवुन प्रामाणिकपणाचे एक अनुकरणीय उदाहरण सामाजापुढे ठेवले आहे.

एस.टी.महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव येथे लिपीक म्हणून कार्यरत असलेले निलेश रामदास सपकाळे हे मोटरसायकल वरून घरी जात असताना एम.आय.डी.सी.भागात त्यांचा (एम.आय. नोट प्रो) कंपनीचा 16 हजार किंमतीचा मोबाईल रस्त्यात पडला. सपकाळे यांना घरी गेल्यावर आपला मोबाईल हरवल्याचे समजले. त्याचवेळी दै.देशदूतचे कर्मचारी प्रकाश भावसार कामावरून सायकलने घरी जात असताना त्यांना तो मोबाईल सापडला.

हा मोबाईल सापडल्यावर तो जवळ ठेवण्याची लालसा त्यांच्या मनात आली असती तर तो ठेवू शकले असते पण त्यांनी तसे न करता त्यावर कोणाचा तरी फोन येईल याची वाट पाहीली. तेवढ्यात निलेश सपकाळे यांचा कॉल आला. आणि भावसार यांनी सदर मोबाईल माझ्याजवळ असल्याचे सांगितले. निलेश सपकाळे यांनी भावसार यांची भेट घेत आपली ओळख पटवून दिल्यावर श्री.भावसार यांनी त्या मोबाईल मालकाला सापडलेला मोबाईल परत केला. श्री.भावसार यांनी प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा परिचय करून दिला. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

निलेश सपकाळे यांनी केला सत्कार
निलेश सपकाळे यांनी हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी दै.देशदूत एम.आय.डी.सी. कार्यालयात येवून शाल,श्रीफळ देवून सत्कार केला व श्री.भावसार यांचे आभार व्यक्त करण्यास माझ्याजवळ शब्द नसल्याचे सांगत ऋण व्यक्त केले.

दै.देशदूतची विश्वासार्हता कायम
निलेश सपकाळे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, दै.देशदूत हे ग्रामीण भागातील सखोल बातम्या देणारे वाचकाच्या विश्वासास पात्र असणारे दैनीक असल्याचे बोलून दाखविले. तसेच हरवलेला मोबाईल देशदूत कर्मचारी प्रकाश भावसार यांनी प्रामाणीकपणे परत केल्याने देशदूतच्या सर्व सहकारी व देशदूत वृत्तपत्रावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!