मुख्यमंत्र्यासभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर गुन्हे दाखल

0
जळगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे व मफलर लावण्यात आले होते. यावेळी निवडणुक आयोगाच्या पथकाने त्याठिकाणी पाहणी करून परवानगीची विचारणा केली. सर्व वाहनांवर विनापरवानगी झेंडे लावले असल्याचे निष्पन्न झाल्याने आठ वाहनांवर कारवाई करुन रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागरपार्कवर मुख्यमंत्र्यांची सभा शुक्रवारी दुपारी घेण्यात आली. या सभेला जिल्हाभरातून लोक खासगी वाहनतून दाखल झाले होते. सभेला आलेल्या वाहनांची निवडणुक विभागातील भरारी पथकातील अधिकारी सचिन दशथराव आयतलवाड यांच्यासह सुरेश पाटील, राजेश भावसार, राजेश विलासराव, गणेश देसले, प्रशांत पाठक या कर्मचार्‍यांकडून सभास्थळी लावण्यात आलेल्या वाहनांची तपासणी केली जात होती. याचवेळी सभास्थळी लावलेल्या आठ ते दहा वाहनांवर पक्षाचे झेंडे व मफलर लावलेले असल्याचे भरारी पथकाला दिसले.

यावेळी पथकाने त्या वाहनांची व्हीडीओ काढून घेत वाहनचालकांकडे पक्षाचा प्रचार करण्याची परवानगी असल्याची विचारणा केली. रिक्षा क्रमांक एमएच 19 जे 6749, टाटा 407 – एमएच 18 एए 1978, टाटा 407 -एमएच 19, एस 4166, स्कॉर्पीओ -एमएच 5 बीडी 1865, स्कॉर्पीओ – एमएच 14 डीएक्स 2069, हिरो कंपनीची मोटारसायकल -एमएच 19 ऐडब्ल्यू 0979 , स्कॉर्पीओ -एमएच 6 बीई 2637, स्कॉर्पीओ -एमएच 18 डब्ल्यू 7786 या आठ वाहनांवर वरील चालकांवर आचारसंहितेच्या कालावधीत सक्षम प्राधिकरणांकडून परवानगी न घेता पक्षाचे झेंडे व मफलर लावले म्हणून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*