Type to search

maharashtra जळगाव

फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार अंमलात आणणे गरजेचे!

Share
जळगाव । फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आपण प्रत्यक्ष अंमलात आणत नसल्यामुळे समाजातील आणि एकूणच आपल्या जगण्यातील लोकशाही वजा होत चालली आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.

बहिणाबाई विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘फुले आंबेडकरी दृष्टिकोनातील भारत आणि आजचे वास्तव’ या विषयावर श्री.कांबळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, विभागप्रमुख प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते.

श्री.कांबळे पुढे म्हणाले फुले-शाहू-आंबेडकर यांचा जन्म म्हणजे या देशातील सटवीचा मृत्यू. कारण त्या आधी सटवीने लिहिलेल्या भविष्यावर हा देश चालत होता. या महापुरुषांनी विषमतामुक्त देशाचे स्वप्न पाहिले. या देशातील स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, शेती असे असंख्य प्रश्न सोडवायचे असतील तर या महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी फार पूर्वीच या सर्व प्रश्नांची उत्तरे देवून ठेवली आहेत. लोकशाही म्हणजे जीवन शौली असून ज्यामध्ये स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय अपेक्षित आहे, असे हे महापुरुष समजत असत. लोकशाहीत स्त्रियांचे स्थान फार वरचे आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी अलिकडच्या काळात जातीच्या व धर्माच्या अस्मिता टोकदार होत चालल्या असल्याचे सांगितले. जयंती साजरी करत असताना आत्मपरिक्षण करुन देशाच्या विकासात अधिक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी प्रा.म.सु.पगारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डी.लिट पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा.डोंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

मिरवणूक जल्लोषात
प्रशासकीय इमारती जवळ या मिरवणुकीचा समारोप झाला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीत कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.सुधीर भटकर, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!