भारतीय सैन्याची तिसरी सर्जिकल स्टाईक?

0
नवीदिल्ली । भारतीय लष्कराने पाकिस्तानातल्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्याची शौर्यगाथा अजुनही देशभर चर्चेचा विषय आहे. असे असतानाच आता लष्कराच्या तिसर्‍या सर्जिकल स्ट्राईकची माहिती समोर आली. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहेत.

म्यानमारच्या लष्करासोबत संयुक्त कारवाई करून भारतीय लष्कराने ही कामगिरी फत्ते केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारीला ही कारवाई सुरू झाली आणि 2 मार्चला संपली. तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांच्या अनेक छावण्या, तळ आणि केंद्र उद्धवस्त झालीत.

भारत आणि म्यानमारच्या सीमेवर रोहिंग्या, अराकान आर्मी आणि एनएससीएन या दहशतवादी संघटनेने तळ निर्माण केले होते. त्या भागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. याची माहिती मिळाल्यानंतर भारताचे लष्कर आणि म्यानमार लष्कराने संयुक्त योजना आखून ही धडक कारवाई केली.

या कारवाईमुळे या भागातल्या अनेक दहशतवाद्यी संघटनांचे कंबरडे मोडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी भारताने तिसर्‍यांदा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र त्याची माहिती सांगणार नाही असे म्हटले होते.

26 फेब्रुवारीला भारताच्या हवाई दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोट येथे पहाटे हल्ला करून जैश ए मोहम्मदचा तळ उद्धवस्त केला होता. त्यात किती दहशतवादी ठार झाले हे अधिकृत जाहीर करण्यात आले नसले तरी त्यात 250 ते 300 अतिरेकी मारले गेल्याची माहिती पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

*