Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

जळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी भाग्यश्री नवटके

Share

जळगाव । जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी असलेल्या भाग्यश्री नवटके यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस दलातील 58 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे तसेच पदोन्नतीचे आदेश गृहविभागातर्फे सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आले. दरम्यान या आदेशात जळगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकपदी नवटके यांची बदली करण्यात आली आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या काही जणांना फोडून काढण्याची भाषा केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या नवटके या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर गृहविभागाने त्यांची औरंगाबाद येथे बदली केली होती. दरम्यान नवटके यांच्याविरुद्ध या प्रकरणात हायकोर्टात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!