Type to search

जळगाव

शांतता कमिटीच्या बैठकीनंतर दोन तरुणांवर चॉपरने प्राणघातक हल्ला

Share

जळगाव । सेंटल फुले मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गटात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. शहर पोलीस स्टेशनच्यावतीने फुले मार्केटमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठक संपल्यानंतर अवघ्या 10 मिनीटानंतर दोन गटात पुन्हा वाद झाला. या वादामुळे झालेल्या गर्दीत दोन तरुणांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री 8.45 वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे सेंटल फुले मार्केट परिसरात तणाव निर्माण झाल्याने व्यवसायिकांनी दुकाने बंद केली. दरम्यान शहर पोलीसांनी चार ते पाच तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दिपक सुकलाल सोनवणे वय 19 व चेतन रविंद्र कोळी वय 21 रा दोघे कांचन नगर अशी जखमींची नावे आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी फुले मार्कटमध्ये दोन गटात जोरदार वाद झाला होता. या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी फुले मार्केट परिसरात शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठक झाल्यानंतर काही वेळातच याठिकाणी वाद सुरु झाला.

ब्युटी सेंटर दुकानावर कामाला असलेला चेतन कोळी व कपड्याचे दुकान लावत असलेला दिपक सोनवणे हे दोन्ही या वादाठिकाणी गेल्यानंतर कोणीतरी अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दिपक सोनवणे याच्या गळ्यावर तर चेतन कोळी याच्या हाताच्या दंडावर कोणीतरी अज्ञाताने वार केले. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. परंतू दोघांवर हल्ला कोणी केला. हे समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत जखमी दोघांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!