Friday, May 10, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध, राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध, राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपोषण

जळगाव – Jalgaon :

शहरात आठवड्याचा पहिला दिवस सोमवार हा विविध आंदोलनांनी गाजला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

- Advertisement -

तर दुसरीकडे नागरी वसाहतीत परमीट रुम बियरबारला परवानगी देवू नये म्हणून महिलांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. याप्रकारे दिवसभरातील तीन आंदोलनांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 जानेवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. दि 11 ते 17 जानेवारी दरम्यान साखळी उपोषण करण्यात येत असून रोज जिल्हयतील वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकरी उपोषणात सहभागी होणार आहे.

गेल्या 45 ते 47 दिवसांपासून दिल्ली येथे विविध संघटनांकडून शेतकरी हित विरोधी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.

परंतु केंद्रशासन याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्षच करीत आहे. याचा निषेध म्हणून तसेच दिल्ली येथील आंदोलनाला पाठींबा म्हणधून राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे.

शेतकरी हित विरोधी कायदे रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

साखळी उपोषणात किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील, सिताराम सोनवणे, राहुल सपकाळे, दिलीप अहिरे, प्रदीप मगर, वाय.एस.महाजन, सुनील देहडे, हाजी गफ्फार मलिक, आदी पदाधिकार्‍यांसह जामनेर व जळगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. उद्या मंगळवारी बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी उपोषणात सहभागी होती, असे अनुक्रमे रविवार 17 जानेवारीपर्यत जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या