Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

शिवाजी महाराजांचा स्त्री सन्मानाचा आदर्श मनात रूजवण्याची गरज

Share
स्त्रीयांनी आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. यासाठी स्त्री शक्ती एकवटायला हवी. सर्वांनी एकत्रित आले पाहिजे.

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीयांना देवीचा दर्जा दिला आहे, पण हे फक्त सण-समारंभासाठी आणि इतर वेळी मात्र राक्षस बाहेर येतो. शिवाजी महाराजांनी स्त्रींयाचा खर्‍या अर्थाने सन्मान कला आहे. स्त्री ही कोणत्या धर्माची, जातीची आहे याकडे लक्ष न देता ती एक स्त्री आहे. याकडे त्यांनी लक्ष दिले होते.

मुस्लिम राजांवर आक्रमण करतांना त्यांनी कोणत्याही स्त्रीची विटंबना, अवेहलना होणार नाही याची सक्त ताकिद मावळ्यांना दिली होती. स्त्रीची अवेलना करणार्‍या मावळ्यांना त्यांनी कडक शिक्षाही दिली होती. मग हा आदर्श आज केाठे गेला.

बहिणीला सासरी झालेला त्रास सहन होत नाही मात्र घरातील सूनेला त्रास देण्यात मोठेपणा समजतात. याबाबत जागर व्हावा. स्त्री ही केवळ नारीच नसून संपूर्ण जग घडवणारी शिल्पकार आहे. आज महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नाव लौकिक प्राप्त केले पाहिजे.

स्त्री करूणा-वीरता आणि शक्तीशाली संपादनकारी शक्ती यांना आव्हान केले जाते. म्हणूनच म्हटले जाते, ‘देवी फक्त देव्हार्‍यात नाही, मनातही बसवा’ मूर्ती बरोबर जीवनात स्त्रीचाही आदर करावा. हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार.
– योगिता सतिश तळेले, ग्रा.पं.सदस्या, न्हावी ता.यावल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!