Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

सासू सुनेच्या नात्यातील दुस्वास नष्ट होण्यासाठीचा जागर व्हावा!

Share
आज स्री हि आपल्याच मातेच्या गर्भात देखील सुरक्षित नाही. या जगात प्रवेश केल्यावरही तिचे इथले भय संपत नाही अशी स्थिती आहे. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या गुंडापर्यंत कुणीही तिच्या वाटेवरच्या अडथळा बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो.

तिच्या आयुष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न मात्र त्यानंतरही तिला पतीच्या आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यातच तिच्या भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे.

अर्थात काही याला अपवादही आहेत. एकंदरीत महिलेला पुरूषां सोबत महिलांकडूनही अत्याचाराला सामोरे जावे लागते. जन्मापासून नातलगांकडून तरूणपणी काही जंगली श्वापदासारखे असणार्‍यांकडून तर लग्नानंतर सासरचे व कधी म्हातारपणी मूलांकडून यातून एकच स्पष्ट दिसून येते कि स्री हि जन्मापासून ते मरेपर्यंत कूठे ना कूठे अत्याचाराची शिकार होतेच.

तिला कायद्याचे कवच असले तरी दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा कमी होत नाही.
यावरच खर्‍या अर्थाने जागर होणे गरजेचे आहे.
सौ वसूंधरा लांडगे व्हा. चेअरमन अर्बन बँक, अमळनेर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!