Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

स्त्री आणि पुरुष या दोन पंखांनीच समाजरुपी पक्षाची भरारी!

Share
माणसाने नेहमी आनंदी रहावे यासाठीच सण उत्सवाला मोठ महत्व आहे. ‘सण उत्सव नसते तर मानवी जीवन रखरखीत वाळवंट बनलं असतं. नवरात्रीच्या उत्सवात सर्वत्र गरबा दांडियांची धमाल असते.

स्त्रीयांच्या प्रगतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे स्त्रीशिक्षण क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी लावलेले हे स्त्रीशिक्षणाचे बीज समाजात वटवृक्षासारखे बहरले व स्त्रीयांच्या प्रगतीला गती प्राप्त झाली.

याचा अर्थ स्त्रियांच्या समस्या संपल्या अस आपण म्हणून शकत नाही. अजूनही स्त्रियांपुढे काही गंभीर समस्या आहेतच. स्त्रीकडे बघण्याचा समाजातील लोकांचा दृष्टीकोन बदलण्याची.

विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री आणि पुरूष हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहेत. आणि हे दोनही पंख जोपर्यंत सारख्या क्षमतेचे असणार नाही तोपर्यंत समाजरूपी पक्षी भरारी घेवू शकणार नाही.

त्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने मला एकच सांगावस वाटत की स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिच्या सन्मान आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल, अशी समाज व्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्त्रीशक्तीचा जागर असेल.
– दीपाली कोळी, जळगाव

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!