Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

मुलींनी अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी!

Share
संसारात पुरूषा इतकात महिलांचा देखील सिंहाचा वाटा असतो. तिचेही महत्व सारखेच असते मात्र आजही स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते.

त्यामुळे तिलाही समान दर्जा मिळणे गरजेचे आहे. शक्तीचे स्वरूप म्हणजे स्त्री आहे. आज स्त्रीया देखील सर्वच पातळ्यांवर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिध्द करित आहेत. स्त्रीयांनी आपली वैचारिक क्षमता व निर्णय क्षमता वाढवून स्वतःला ओळखण्याची गरज आहे.

स्त्रीयांनी आजच्या आधुनिक युगात पूर्वीच्या संस्कारांव्यतिरिक्त मुलांवर अतिरिक्त संस्कार करण्याची गरज आहे. घरातील ज्येष्ठांना, सर्व सदस्यांना वयोमानाप्रमाणे सन्मान देवून मुलींनी आपल्या आईच्या कामात देखील मदत करणे तितकेच आवश्यक आहे.

समाजात वावरतांना मुलींनी कुठलाही अतिरेक होणार नाही याची दक्षता घेणेही इतकेच महत्वाचे आहे. सर्वच पातळींवर एकाच जन्मात विविध भुमिका पार पाडणार्‍या स्त्रियांना घरासह समाजाकडूनही सन्मान दिला जावा ही रास्त अपेक्षा आहे.

विशेषतः ज्या पालकांना मुली आहेत त्यांनी आपल्यज्ञ मुलींची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. मुलींनीही आपल्या पालकांच्या विश्वास पात्र ठरावे. शिक्षण घेत करीअरकडे प्रथतम लक्ष द्यावे. विवाहोत्तर सासरीही विश्वास सार्थ ठरवावा.
– सौ.रजनी सावकारे, अध्यक्ष- प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!