कलावंत म्हणून यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – प्रत्येकाच्या जीवनात कला असणे गरजेचे आहे. नाट्यकलाकार हा समाजाचे कुठेतरी देणे लागत असतो.
तसेच जीवनात कलाकाराला यशस्वी होण्यासाठी त्याने मोठी स्वप्ने पाहीली पाहीजे व ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याच्या अंगी जिद्द व चिकाटी यासह त्याची कष्ट करण्याची तयारी असल्यास तो भविष्यात आपल्या क्षेत्रात यशस्वी होत असल्याचा सूर कंप्लीट थिएटर कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उमटला.
पद्मभूषण हबीब तनवीर यांना समर्पित जननायक थिएटर आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तसेच भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पहिले राष्ट्रीय स्तरावरील 8 दिवसीय निवासी कंप्लीट थिएटर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ.प्रतिमा जगताप आणि मुख्य नाट्य प्रशिक्षक प्रविणकुमार गूंजन, रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, माजी सहप्रांतपाल गनी मेनन, संदीप काबरा, अ‍ॅड. सुरज जहाँगीर चौधरी, जैन उद्योग समुहाचे व्यवस्थापक अनिल जोशी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

दरम्यान आठ दिवसीय कार्यशाळेत नाट्य प्रशिक्षक प्रविणकुमार गूंजन तसेच डॉ.अनिता पाटील, सुनिता देवरे, अनिल कोष्टी, रमेश भोळे, योगेश शुक्ल, किरण अडकमोल, वैभव मावळे, विनोद ढगे, अ‍ॅड. महेश भोकरीकर यांनी प्रशिक्षणार्थींना विविध सत्रात नाट्य कलेवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत 30 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.

यशस्वीतेसाठी रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, सचिव संजय इंगळे गनी मेनन, डॉ.राजेश पाटील, संदीप काबरा, फिरोज पिंजारी, अ‍ॅड. रवी गुजराथी, अ‍ॅड. वासुदेव बुधुखले, फरीद खान, सुरेश चौधरी, नितीन भोसले, विजय शिंपी, योगेश हिवरकर, संतोष खोपडे, सोनल चौधरी यांनी परिश्रम घेतले. आ. राजूमामा भोळे, अनिल जोशी, फारुख शेख, नगरसेवक सुनिल माळी, नरेंद्र चव्हाण, रविंद्र धर्माधिकारी , विजय जैन यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन स्वामी पाटील यांनी तर आभार होनाजी चव्हाण यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*