Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजळगाव : उत्तर प्रदेशात ४५ मजुरांना घेवून जाणारा ट्रक पकडला

जळगाव : उत्तर प्रदेशात ४५ मजुरांना घेवून जाणारा ट्रक पकडला

जळगाव  – 

नाशिक येथून उत्तर प्रदेशात ४५ मजुरांना घेवून जाणारा ट्रक जिल्हापेठ पोलीसांनी प्रभात चौकात रविवारी दुपारी पकडला. ट्रकमधील सर्व मजुरांना खबरदारी म्हणून जिल्हा कोवीड रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पथक महामार्गावर गस्त घालत असताना एक ट्रक संशयितरित्या जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रकचा पाठलाग करुन तो प्रभात चौकात रोखला. या ट्रकमध्ये ४५ परप्रांतीय मजूर आढळले. नाशिक येथून पायी चालत होते.

नंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील गावाकडे जाण्यासाठी हा ट्रक भाड्याने केला होता. सर्व मजूर नाशिक येथून उत्तरप्रदेशात आपापल्या गावाकडे जात होतेे. या मजुरांकड परराज्यात जाण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगितले.

खबरदारी म्हणून सर्वांना तातडीने जिल्हा कोवीड रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आल. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

याबाबत जिल्हापेठ पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध संचारबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईले, असेही निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या