87 अस्थायी वाहनचालकांपैकी दोघांना कायम सेवेतून वगळले

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – मनपाच्या 87 अस्थायी वाहनचालकांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनातर्फे नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मात्र त्यातून दोन अस्थायी वाहनचालकांना वगळून नियुक्ती आदेशच दिली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
महापालिकेत गेल्या 20 वर्षांपासून 87 अस्थायी वाहनचालक कार्यरत आहेत. कायम सेवेत घेण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला होता.

मात्र प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयाविरोधात 87 अस्थायी वाहनचालकांनी औरंगाबाद खंडपीठात पुन्हा याचिका दाखल केली.

या याचिकेवर कामकाज झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने मनपाकडे रिक्त असलेल्या जागांवर आणि पदनिर्मिती करुन सर्व वाहनचालकांना कायमसेवेत सामावून घ्यावे, असे आदेश दिले.

त्यानुसार प्रशासनाने रिक्त असलेल्या 50 जागा आणि 42 जागांची निर्मिती करुन 92 वाहनचालकांना नियुक्तीचे आदेश दिले आहे.

मात्र हे नियुक्तीचे आदेश देतांना अस्थायी वाहनचालक सुभाष बेडीस्कर, तलत मेहमुद या दोघांना नियुक्तीचे आदेश दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

पाच निवृत्त वाहनचालकांना लाभ
अस्थायी वाहनचालकांपैकी पाच वाहनचालक निवृत्त झाले आहे. मात्र नियमित सेवेच्या प्रक्रियेत पाच वाहनचालकांना लाभ दिला. तर मग दोन वाहनचालकांना लाभ का दिला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*