शासनाकडून 80 कोटी 56 लाखाची रक्कम हुडकोकडे परस्पर वर्ग

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे 2004, 2005 आणि 2008 या वर्षात वेगवेगळ्या विशेष अनुदानाच्या निधीतून तब्बल 80 कोटी 56 लाखाची रक्कम शासनाकडून हुडकोकडे परस्पर वर्ग झाली असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
तत्कालीन जळगाव नपाने घरकूल, वाघूरसह विविध 21 योजनांसाठी हुडकोकडून 141 कोटी 34 लाखाचे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाचे हप्ते थकल्यामुळे 2004 मध्ये कर्जाचे रिशेड्युलींग करण्यात आले.
त्यावेळी देखील महानगरपालिकेची आर्थिकस्थिती बिकट असल्याने हप्ते भरणे शक्य झाले नाही. हुडको कर्जासाठी राज्य शासनाने हमी घेतली असल्याकारणाने महानगरपालिकेला वेगवेगळ्या विशेष अनुदानातून मिळणाररी रक्कम शासनाने हुडकोकडे वर्ग केली आहे.

2004, 2005 आणि 2008 या तीन वर्षामध्ये विशेष अनुदानापोटी मिळालेल्या निधीतून 80 कोटी 56 लाखाची रक्कम वर्ग केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन वर्षात एकही हप्ता भरला नाही
हुडको कर्जापोटी दरमहा हप्ता भरणे अनिवार्य होते. मात्र 2011-12 आणि 20012-13 या दोन वर्षामध्ये एकही हप्ता भरला नाही त्यामुळे निर्धारीत रकमांवरती व्याज आकारणी झाली आहे.

दिल्लीत अंतीम निर्णय
हुडको कर्जप्रकरणी मनपा प्रशासनाने 77 कोटी 45 लाखाचा प्रस्ताव तयार केला असून शासनाकडे सादर केला जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव हुडकोकडे सादर केला जाणार असून दि.29 रोजी हुडकोच्या संचाललकांची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतीम निर्णय होईल.

 

 

LEAVE A REPLY

*