नामकरणाचा ठराव झाल्यानंतर पुन्हा प्रस्ताव

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-बहिणाबाई उद्यानाच्या एका बाजूला महेश चौक नामकरण करताच दुसर्‍या बाजूला कवयित्री बहिणाबाई चौक नामकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मात्र 2013 रोजी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप स्मारक समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंह चौक नामकरण असा ठराव केला आहे.
त्यामुळे बहिणाबाई चौक नामकरण करण्याचा प्रस्ताव रद्द होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एम.जे. कॉलेज ते भास्कर मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावरील बहिणाबाई उद्यानाजवळील चौकाला कवयित्री बहिणाबाई चौक असा नामकरणाचा फलक लावण्यास नगरसेविका सीमा भोळे यांनी प्रस्ताव दिला आहे.

मात्र दि.31 मे 2013 रोजी महासभेत ठराव करुन स्वातंत्र्य चौक ते एम.जे. कॉलेज रस्त्यावरील बहिणाबाई उद्यानाजवळ क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह चौक नामकरण करुन फलक लावण्याचा ठराव करण्यात आला आहे.

त्यानुसार दि.11 जून 2013 रोजी नामकरण सोहळा देखील करण्यात आला आहे.

त्यावेळी किशोर पाटील हे महापौर होते. चौकाला नाव देण्यावरुन महापालिकेत सध्या चांगलीच चर्चा रंगु लागली आहे.

 

LEAVE A REPLY

*