सफाईच्या ठेक्यात प्रशासन – सत्ताधार्‍यांची मिलीभगत

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी- जळगाव शहरात 37 प्रभागांपैकी 22 प्रभागांमध्ये साफसफाईचे ठेके दिले आहे. परंतु त्या प्रभागांमध्ये स्वच्छता होतांना दिसत नाही.
तरीही देखील प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. सफाईच्या ठेक्यात प्रशासन आणि सत्ताधार्‍यांची मिलीभगत आहे.
त्यामुळेच प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जळगाव फर्स्टतर्फे दि.18 रोजी स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहरात साफसफाई करण्यासाठी 22 प्रभागांमध्ये सफाईचे ठेके दिले असून 15 प्रभागांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात.

दरमहा जवळपास दीड कोटी रुपये खर्च करुनही स्वच्छता होतांना दिसत नाही. ठेके दिलेल्या प्रभागांमध्येच स्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.

त्यामुळे साफसफाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जळगाव फर्स्टतर्फे दि.18 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत शहर स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी सहा भाग करण्यात आले असून व्हॉटस्अ‍ॅपवर तक्रारी नोंदविता येणार असल्याची माहिती डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिली.

पत्रकार परिेषदेत अशफाक पिंजारी, डॉ.विकास निकम, विशाल वाघ, अनिल साळुंखे, शोएब शेख, योगेश पाटील, राकेश पाटील, राजेंद्र महाजन, प्रितम पाटील, विजय राठोड आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*