मुक्ताईनगर नगरपंचायतीची अधिसूचना उद्याच !

0
विकास चौधरी,मुक्ताईनगर । दि.29-गेल्या अनेक वर्षांपासुन रेंगाळलेल्या मुक्ताईनगर नगर पंचायतीचा तिढा आता सुटणार आहे. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी याबाबत संकेत दिले.
ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळणेबाबत उद्या दि. 31 जुलै रोजी नगरविकास मंत्रालयाकडून अधिसुचना जाहीर होणार असल्याची माहिती आ.खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांनी दिली.

मुक्ताईनगरला नगरपंचायत होणार अशा चर्चा या आधीही अनेकवेळा शहरात झाल्या, पण राजकीय हस्तेक्षेपामुळे होणार्‍या नगरपंचायतीची प्रक्रिया थंड बस्त्यात प्रत्येक वेळी गुंडाळली गेली.

मात्र आता स्वत: आ. खडसे यांनी नगरपंचायत होणार? असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे ग्राम पंचायतीच्या कार्यकाळात असलेल्या अनेकविध समस्यांपासुन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच कर्मचार्‍यांचीही दिवाळी होणार आहे.

मुक्ताईनगर ग्राम पंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ डिसेंबर 2017 मध्ये पुर्ण होत असल्याने पुढील निवडणुकी संदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरु झाली होती. त्याचाच एक भाग म्हणुन प्रभाग रचना, आरक्षण काढण्यात आले होते.

आता नगरविकास मंत्रालयाकडून फाईलवर स्वाक्षरी झाली असुन सोमवार रोजी अधिसुचना जारी होणार असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या घोषणेची केवळी औपचारीकता बाकी आहे.

 

LEAVE A REPLY

*