Type to search

जळगाव

उमरा येथे दोन गटात हाणामारी; १७ जखमी

Share

मुक्ताईनगर | वार्ताहर – तालुक्यातील उमरा येथे दोन गटात हाणामारी होऊन २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात १७ जण जखमी झाले आहेत. या घटनेत परस्परांत विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटना दि. २५ रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेदरम्यान उमरा येथे घडली.

याबाबत एक फिर्याद मुक्ताईनगर तालुक्यातील उमरा येथील गजानन नगराम पवार यांनी तर दुसरी फिर्याद मुक्ताईनगर तालुक्यातील उमरा येथील उषाबाई संजय जाधव यांनी दिली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दोन्ही फिर्यादीच्या मुलगा-मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. व पुढे ते लग्न करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी आधार कार्डची मागणी केल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता हाणामारी झाली.

त्यात लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये गजानन पवार, संदीप चव्हाण, सुनील राठोड, रवी राठोड, गोविंद राठोड, किरण राठोड, गोलु राठोड, मुमराज राठोड, अक्षय पवार तसेच सचिन जाधव, रघुनाथ जाधव, लखन जाधव, शिवराम जाधव, विनोद जाधव, युवराज जाधव, बाळू जाधव, अमर जाधव असे एकूण दोन्ही गटातील १७ जण जखमी झाले असून यापैकी आठ आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!